पुणे

इंदापुरात पोलिसांकडून ४५ लाखांचा माल नष्ट

CD

इंदापूर, ता. १५ : इंदापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या गुन्ह्यांतील जप्त केलेला तब्बल ४५ लाख ४१ हजार ८० रुपयांचा गुटखा, तंबाखूमिश्रीत पदार्थ व इतर मुद्देमाल न्यायालयाच्या परवानगीने आणि अन्नभेसळ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोत नष्ट केला.
इंदापूरचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली व अन्नसुरक्षा अधिकारी शुभांगी कर्णिक यांच्या उपस्थितीत वरील कार्यवाही केली. मागील काही वर्षांमध्ये इंदापूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत जप्त केलेला मुद्देमाल पोलिस ठाण्यात पडून होता. तो नागरिकांच्या आरोग्यास अपायकारक असल्याने त्याची विल्हेवाट लावण्याची आवश्यकता होती. त्यानुरूप न्यायालयाकडे परवानगी मागितल्यानंतर न्यायालयाने संबंधित मुद्देमाल नष्ट करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सर्व मुद्देमाल इंदापूर नगरपरिषदेच्या कचरा डेपोत पूर्णपणे जाळून नष्ट केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: पुणे जिल्ह्यात दाेन दिवसांपासून अवकाळीने शेतीचे नुकसान: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अँक्शन मोडवर, तातडीने पंचनाम्याचे निर्देश!

Dhurandhar 2 ने पहिल्याच दिवशी कमावला 'इतक्या' कोटींचा गल्ला, बॉलिवूडच्या ओपनर सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडले

Alphonso Mango Price : हापूसचा 'रुबाब' वाढला! 5 हजारांपासून 12 हजारांपर्यंत एक पेटी; सोन्याच्या दरात विकला जातोय कोकणचा राजा

Accident News : देवदर्शन ठरले अखेरचे ! भीषण अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांंचा दुर्दैवी मृत्यू

Jalna News: परतूर तालुक्यात कामगार योजनेत मनमानी; वर्ष उलटले तरीही क्लेम रखडलेले

SCROLL FOR NEXT