पुणे

दिव्यांगाच्या घराचे स्वप्न होणार साकार

CD

संतोष आटोळे : सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता.२६ : जिल्ह्यातील घरकुलाचे स्वप्न पाहणाऱ्या दिव्यांगांचे स्वप्न पूर्णत्वास येणार आहे. जिल्ह्यातील ४७१ दिव्यांगांच्या घरकुलाला मंजुरी मिळाली आहे. यासाठी प्रतिकूल घरकुल १ लाख २० हजार याप्रमाणे पाच कोटी ६५ लाख २० हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग घरकुल योजनेअंतर्गत तालुकास्तरीय पंचायत समिती स्तरावरून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडून फेरतपासणी करीत पात्र प्रस्तावांना शासनाच्या ग्रामविकास व जल विभागाकडील शासन निर्णयानुसार समाज कल्याण सल्लागार समितीच्या सभेने दिलेल्या मान्यतेवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यातील ४७१ पात्र दिव्यांग लाभार्थ्यांच्या घरकुलाला मंजुरी दिली असून यामध्ये सर्वाधिक ११३ घरकुले हे इंदापूर तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी मंजूर झाले आहेत.यामुळे दिव्यांगांचे घरकुलाचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यामुळे दिव्यांग बंधू-भगिनी यांच्यामधून समाधान व्यक्त होत आहे.

तालुका निहाय पात्र दिव्यांग घरकुल लाभार्थी व एकूण अनुदान
१) आंबेगाव - ३३ - ३९ लाख ६० हजार
२) बारामती - २९ - ३४ लाख ८० हजार
३) भोर - ३७ - ४४ लाख ४० हजार
४) दौंड - ४७ - ५६ लाख ४० हजार
५) हवेली - ३ - ३ लाख ६० हजार
६) इंदापूर - ११३ - १ कोटी ३५ लाख ६० हजार
७) जुन्नर - ७० - ८४ लाख
८) खेड - ५८ - ६९ लाख ६० हजार
९) मावळ - ० - ०
१०) मुळशी - १३ - १५ लाख ६० हजार
११) पुरंदर - २६ - ३१ लाख २० हजार
१२) शिरूर - १८ - २१ लाख ६० हजार
१३) वेल्हा - २४ - २८ लाख ८० हजार

दिव्यांग नागरिकांच्या सक्षमीकरणासाठी सरकार कटिबद्ध आहे. दिव्यांगांना स्वतःचे घर मिळावे, आत्मनिर्भर बनावे व समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी सरकारच्या माध्यमातून योजना राबविण्यात येत आहेत.याचा पात्र लाभार्थ्यांनी अधिकाधिक लाभ घेणे आवश्यक आहे.
- दत्तात्रेय भरणे, क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य
-
जिल्हा परिषद निधी २०२४ २५ अंतर्गत पाच टक्के दिव्यांग कल्याण व पुनर्वसन निधी या माध्यमातून ४७१ दिव्यांग बांधवांच्या घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांनी नियमाप्रमाणे अंमलबजावणी करीत स्वतःच्या हक्काच्या घरकुल योजनेचे स्वप्न पूर्ण करावे. प्रशासनाच्या वतीने त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.
- गजानन पाटील, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पुणे

पंचायत समिती स्तरावर प्राप्त झालेल्या पात्र दिव्यांग घरकुल अर्जांचे प्रस्ताव पूर्ण करीत जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले होते जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडून मिळालेल्या मंजुरीमध्ये तालुक्यातील ११३ प्रस्तावांना मान्यता मिळाल्याने दिव्यांगांचे घरकुल स्वप्न पूर्ण होणार आहे यामुळे मंजूर लाभार्थ्यांनी वेळेत आपले घरकुल बांधावे.
- सचिन खुडे , गटविकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर

योजनेचा उद्देश
• दिव्यांगांना स्वतःच्या हक्काचे घर मिळावे.
• दिव्यांगाना आत्मनिर्भर बनवणे व जीवनशैली सुधारणे.
• समाजाचा त्यांच्या प्रति बघण्याचा दृष्टिकोन बदलणे
• स्वतः साठी राहण्यासाठी आणि जीवन जगण्यासाठी स्थित आणि पक्के आश्रय प्रदान करणे.

• दिव्यांगांना घरासाठी इतर कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये.
• निराधार दिव्यांगांना सक्षम बनवणे. त्यांना आधार देऊन आत्मनिर्भर बनवण्यास मदत करणे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
• आधार कार्ड
• बँक पासबुक
• अर्जदाराचा जातीचा दाखला
• उत्पन्नाचा दाखला
• दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र
• यापूर्वी लाभ न घेतल्याचा पुरावा
• रहिवासी दाखला
• घरकुलासाठी स्वतःच्या जागेचा आठ-अ किंवा सात बारा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT