पुणे

सौर पॅनलसह डाळिंब,पेरूला फटका

CD

इंदापूर, ता.१६ : गोखळी, तरंगवाडी, रामकुंड, सोनमाथा (ता. इंदापूर) भागात गेली आठ दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणीच्या शेतकऱ्यांच्या घरावरील छत उडून गेली आहेत. तसेच अनेक जणांच्या सौर ऊर्जा पॅनलचे मोठे नुकसान झाले आहे.
मुसळधार पावसामुळे डाळिंब, पेरू, ड्रॅगन फ्रूट, शेवगा यासह तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे संबंधित शेतकरी यांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन त्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमधून होत आहे.
याबाबत पाच ते १५ जून या कालावधीत झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे इंदापूर तालुक्यातील अनेक भागांमधील फळबागांसाठी केलेले स्टेजिंग उखडून पडले आहे. मोठ्या प्रमाणात बागांमधील झाडे उन्मळून पडली आहेत. त्याचप्रमाणे तोडणी योग्य पिके उद्ध्वस्त होऊन मोठ्या प्रमाणात फळगळती झाली आहे. गोखळी येथील शेतकरी जितेंद्र लांडगे यांच्या गट नंबर ८७ मध्ये कुसुम योजना अंतर्गत बसवलेल्या सौर पंपाचे सोलर पॅनल वादळी वाऱ्यामुळे उखडून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तर निमगाव केतकी (जाधववाडी) येथील शेतकरी सोपान जाधव यांच्या साडेतीन एकर क्षेत्रातील अडीच हजार झाडांचे स्टेजिंग व नेट वादळी वाऱ्याने उडून गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, डाळिंब पेरू ड्रॅगन फ्रूट तसेच तरकारी पिके जमीनदोस्त झाली असून प्रशासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.


05511

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आधी NEET अन् आता TET; महाराष्ट्रात पुन्हा पेपरफुटीचं ग्रहण, ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द, लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य पुन्हा टांगणीला

What is Gautam Adani Startup Initiative? फक्त मोठ्या शहरातच नाही, आता खेड्यापाड्यातील उद्योजकांनाही मिळणार अदानींचा पाठिंबा; काय आहे 'वंदे भारतम्' उपक्रम?

Bank News: 30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार? बँक ऑफ महाराष्ट्र ने दिले मोठे स्पष्टीकरण

कोकणात 'या' ठिकाणी झालंय 'विसरू नको तू मला' या मालिकेचं शूटिंग; भारावलेला शाल्व म्हणाला, 'इथे फक्त फिरायला आलेलो पण...'

Jio, Airtel, Vi की BSNL...कोणतं सिमकार्ड आहे बेस्ट? 'ही' कंपनी देते जास्त ऑफर्स अन् जबरदस्त रिचार्ज प्लॅन्स, नेटवर्कही एकदम टॉप

SCROLL FOR NEXT