इंदापूर, ता. २ : येथील संजीवनी सोशल फाउंडेशन संचलित डॉ. कदम गुरुकुलमध्ये रस्ता सुरक्षा दिंडीचे आयोजन केले होते. यावेळी हरिनामाचा गजर करीत गुरुकुलच्या बाल वैष्णवांनी विठ्ठल, रखुमाई आणि विविध संतांच्या वेशभूषा आणि वारकरी वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी टाळ, मृदंग व तुळशी डोक्यावर घेऊन हरिनामाचा गजर करीत सर्व बाल वैष्णवांनी पालखी सभोवताली मोठ्या उत्साहात गोल रिंगण केले. मृदंगाच्या ठेक्यावर फुगडीचाही आनंद लुटला.त्यानंतर पालखी आणि दिंडी शहरातील रामवेस नाका येथून नेहरू चौक मार्गे नगर परिषद मैदानावर आणण्यात आली. त्या ठिकाणी बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी आणि इतर कर्मचारी तसेच एलआयसी ऑफ इंडियाचे कर्मचारी यांनी पालखीचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश देत रस्ता सुरक्षा या संकल्पनेवर लेखन श्रीराम कवितके यांनी लिहिलेल्या पथनाट्याचे सादरीकरण केले. त्यास रवींद्र नागटिळक यांनी सहकार्य केले.
दरम्यान गुरुकुलमध्ये पालखी सोहळ्याचे पूजन डॉ. कदम गुरुकुलच्या शैक्षणिक संचालिका डॉ. सविता कदम, प्राचार्या माधुरी गोखले, उपप्राचार्य ऋषी बासू, स्कूल मॅनेजर संदीप जगताप, पांडुरंग घाडगे, दिलीप बोधक, सचिन जाधव, गीतांजली बोंगाणे यांच्या हस्ते करण्यात आले. तनया पवार आणि प्रचिती घोगरे यांनी सूत्रसंचालन केले. गणेश घाडगे यांनी आभार मानले. मृदंग साथ महेश झगडे, दत्तात्रेय झांबरे यांनी. तर अभंग आणि मनोज पवळ व मंगेश चंदनशिवे यांनी आरती गायली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.