पुणे

उजनी धरणातील पाणी प्रदूषणाची आज पाहणी

CD

इंदापूर, ता. ५ : उजनी धरणाच्या पाणी प्रदूषणाचा अभ्यास करण्यासाठी दिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचे संशोधक रविवारी (ता.७) भिगवण, पळसदेव व इंदापूरला भेट देणार आहेत. दूषित पाण्याची पाहणी केल्यानंतर इंदापूर येथे बैठकीचे आयोजन केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उजनीच्या दूषित पाणी प्रश्नाची दखल घेऊन १६ मे २०२५ रोजी आंतरराष्ट्रीय जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांनी दूषित पाणी प्रश्नाची माहिती घेत प्रदूषित पाण्याबाबत काळजी व्यक्त केली होती. यावेळी त्यांच्यासह जलबिरादरी महाराष्ट्र प्रांताध्यक्ष नरेंद्र चुघ, तेलंगणाचे माजीमंत्री व्ही. प्रकाश राव, आंध्र प्रदेशचे सत्यनारायण बोलशेट्टी, हैदराबादचे आकाश पांडे यांनी भिगवण या ठिकाणी भेट देत उजनी धरणातील प्रदूषित पाण्याची पाहणी केली होती. ही बाब गंभीर असल्याचे सांगत जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्र सिंह यांनी यावर तीव्र आवाज उठवला जाईल, अशी घोषणा केली होती. कारण उजनीचे पाणी दूषित असून सदरचे पाणी माणसालाच नव्हे तर प्राण्यांना सुद्धा पिण्यायोग्य नाही. त्यामुळे अनेक जलचर यामध्ये मरून फुगून वर आल्याचे दिसत आहेत. म्हणजे हे पाणी पिल्याने अनेक स्वरूपाचे गंभीर आजार होतात. यावर स्पष्ट भूमिका घेऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी संघर्ष केला जाईल, असे डॉ.राजेंद्र सिंह यांनी सांगितले होते.

दरम्यान, रविवारी (ता.०७) इंदापूर तालुक्यातील उजनी पट्ट्यातील भिगवन, पळसदेव व इंदापूर या ठिकाणी दिल्ली येथील विज्ञान आणि पर्यावरण केंद्राचे संशोधक भेट देणार असून त्यामध्ये स्वाती भाटिया, तारा तन्मय, जान्हवी खत्री आणि महाराष्ट्र बिरादारीचे अध्यक्ष नरेंद्र चूघ हे सहभागी असणार आहेत. हे संशोधक मच्छीमार, शेतकरी, नागरिक यांच्याशी संवाद साधत दूषित पाण्याचा मानव, पशू जलचरावर काय परिणाम होतो हे समजून घेणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT