पुणे

इंदापूरच्या आश्रमशाळेत रांगोळी स्पर्धा

CD

इंदापूर, ता. २६ : येथील भिमाई आश्रमशाळेत जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा पार पडल्या. इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे अंतर्गत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त याचे आयोजन केले होते.
यामध्ये जिल्ह्यातील विविध आश्रमशाळांमधील ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्‍घाटन संस्थेचे सचिव ॲड. समीर मखरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या अध्यक्षा शकुंतला मखरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. यावेळी तथागत गौतम बुद्ध, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब, राजमाता अहिल्यादेवी होळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, माता रमाबाई आंबेडकर व इंदापूरचे माजी नगराध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे यांच्या प्रतिमांना शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत दीपप्रज्वलनाने स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी विविध आश्रमशाळेतून आलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी परीक्षक म्हणून संदीप गोसावी (तळेगाव ढमढेरे), अश्विनी सोनटक्के (आणे) यांची नियुक्ती सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण पुणे यांनी केली होती. स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील मुखई, तळेगाव ढमढेरे (शिरूर), वाघोली (हवेली), आणे (जुन्नर), सोनवडी, मोरेवस्ती (दौंड), वाघळवाडी, मुर्टी मोडवे (बारामती), भोसरी (पुणे), इंदापूर आदी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यांत स्वच्छ भारत, स्वातंत्र्य दिन, सर्व शिक्षा अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, हरित वसुंधरा, बेटी बचाव बेटी पढाव, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महिला सक्षमीकरण, मोबाईलचे व्यसन या विषयांवर वयोगटानुसार रांगोळी काढण्यासाठी संधी देण्यात आली. या स्पर्धेमुळे आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना कलात्मक कौशल्य दाखवण्याची आणि वाढवण्याची संधी मिळाली.
संदीप गोसावी यांनी रांगोळीचे महत्त्व सांगितले. अनिता साळवे यांनी प्रास्ताविक, नानासाहेब सानप, हिरालाल चंदनशिवे यांनी सूत्रसंचालन व साहेबराव पवार यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे संचालक संजय कांबळे, शिल्पकार विक्रम वाघमोडे, सामाजिक कार्यकर्ते माऊली नाचण, सूरज धाईंजे तसेच जिल्ह्यातील आश्रमशाळांचे स्पर्धक, शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu crisis updates: जम्मूत परिस्थिती बिकट, जिल्हाधिकाऱ्यांनी दिले मोठे आदेश!

CM Himanta Biswa Sarma: मुख्यमंत्री सरमा यांनी धुबरी जिल्ह्यासाठी दिले ‘शूट अ‍ॅट साइट’चे ऑर्डर!

Hadapsar News : ओंकार जाधव याने वडिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी माउंट किलीमांजारो शिखर केले सर

Sachin Tendulkar: जो रुट मास्टर-ब्लास्टरचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ; सचिन म्हणतोय, 'तो अजूनही...'

Ganeshotsav: गणपती आगमन-विसर्जनासाठी महत्त्वाची बातमी! मुंबईतील १२ पूल धोकादायक, महापालिकेचं आवाहन

SCROLL FOR NEXT