पुणे

मानाच्या गणपतींची इंदापुरात विधिवत पूजा

CD

इंदापूर, ता. ८ ः शहरातील मानाच्या गणपतींची विधिवत पूजा करून पारंपरिक वाद्यासह आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखीसह रथातून विसर्जन मिरवणुका काढत गणरायाला निरोप देण्यात आला. मिरवणुकांमध्ये महिलांच्या विविध पथकांच्या सहभागाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनीही विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला.
शहरातील मानाच्या पहिल्या श्री सिद्धेश्वर मंडळाच्या गणरायाची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीप्रसंगी डॉ. कदम गुरुकुलच्या विद्यार्थ्यांचे ढोल- ताशा पथक, तसेच महिलांचे लेझीम पथक, टाळ- मृदुंग पथक, गोफ, आराधी यांच्यासह पारंपरिक ढोल- ताशा पथक लक्षवेधक ठरले. मानाचा दुसरा गणपती श्री नरसिंह प्रासादिक मंडळाच्या गणरायाची आरतीही मान्यवरांच्या हस्ते झाली. सोनेरी रथामध्ये सजावट करीत ढोल- ताशाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मानाचा तिसरा गणपती नेहरू चौक सामाजिक मित्र मंडळाचीही ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढली. मानाचा चौथा गणपती शहीद भगतसिंग मित्र मंडळ यांनीही आकर्षक सजावट केलेल्या रथामध्ये गणपतीची मिरवणूक काढत गणरायाला निरोप दिला.
दरम्यान, गणेश विसर्जनाच्या मार्गावर नगरपरिषद, पोलिस प्रशासन, नागरी संघर्ष समिती, तसेच रोटरी क्लबच्या वतीने गणेश मंडळांचा सन्मान करण्यात आला. शिवदत्त जनकल्याण ट्रस्टतर्फे प्रसाद वाटप करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रोहित शर्मा, विराट कोहली ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार का? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स; India A कडून खेळण्याचा अद्याप निर्णय नाही

Latest Marathi News Updates: गणेश विसर्जनात कृत्रिम तलावांसाठी बीएमसीकडून लाखो लिटर पाण्याचा वापर

Shoumika Mahadik : मागची ४ वर्षे गोकुळच्या वार्षिक सभेला शौमिका महाडिकांची खुर्ची कोपऱ्यात, यंदा मात्र थेट मध्यभागी; सभा वादळी...

Shivaji Maharaj : कोल्हापुरात जपून ठेवल्या आहेत शिवाजी महाराजांच्या अस्थी...आजही शिवभक्त घेतात दर्शन!

Mumbai Local: लोकल कोंडीतून सुटका कधी? ‘एमयूटीपी’वर आतापर्यंत कोट्यवधींचा खर्च; गर्दी कायम

SCROLL FOR NEXT