पुणे

इंदापुरातील प्राथमिक शाळांच्या भिंती झाल्या बोलक्या

CD

इंदापूर, ता. ८ ः येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलच्या सन १९९६ मधील १०वीच्या माजी विद्यार्थ्यांनी शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक चार व शाळा क्रमांक सहाचे नूतनीकरण करीत शाळेचे रूप बदलले. यामुळे शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही चांगल्या शैक्षणिक परिसर निर्माण झाल्याने शिक्षक तसेच विद्यार्थ्यांनी आभार व्यक्त केले.
माजी विद्यार्थ्यांकडून दरवर्षी शिक्षक दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्या अनुरूप यावेळी शहरातील प्राथमिक शाळेची संरक्षण भिंत बांधणे, पेव्हर ब्लॉक बसविणे, रंगकाम, बोलक्या भिंती अशी विविध कामे माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करण्यात आली. तसेच, शिक्षक दिनाचे औचित्य साधून तत्कालीन शिक्षक सुभाष महाजन, बाबासाहेब घाडगे, जनार्दन देवकर, गोरक्षनाथ ठोंबरे, संजय सोरटे यांचा सत्कार करण्यात आला.
याबरोबरच इंदापूरचे केंद्रप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, इंदापूर शिक्षक समितीचे अध्यक्ष सुनील शिंदे, शाळा शिक्षण व्यवस्थापन समितीचे सदस्य माजी नगरसेवक कैलास कदम यांसह नासा भेटीसाठी निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थी मोहम्मद ओमर शेख यांचाही गौरव करण्यात आला. तसेच, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सुहास मोरे, शिक्षक भारती संघटनेचे अध्यक्ष सतीश शिंदे, शिक्षक सोसायटीचे माजी अध्यक्ष शशिकांत शेंडे, दत्तात्रेय ठोंबरे, पुणे जिल्हा शिक्षक सोसायटीचे सचिव शहाजी पोफळे, पारेकर वस्ती शाळेचे मुख्याध्यापक संतोष घोडके, तोबरे वस्ती शाळेचे शिक्षक वामनराव गायकवाड, सुगाव शाळेचे मुख्याध्यापक बापू आदलिंग, इंदापूर शाळा नंबर पाचच्या मुख्याध्यापिका सुलताना मोमीन, आर. के. शहा शाळेचे मुख्याध्यापक जगदाळे, साळवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौरी मखरे, नारायणदास रामदास प्राथमिक विद्यालय मुख्याध्यापिका सुप्रिया आगरखेड, इंदापूर शाळा नंबर चारचे मुख्याध्यापक वासुदेव पालवे, सहशिक्षक विकास घुगे, वैजयंता घुगे, इंदापूर नंबर सहाचे मुख्याध्यापक विलास शिंदे, सहशिक्षक सुरेश लोंढे याचाही सन्मान करण्यात आला.
हा कार्यक्रम यशस्वितेसाठी माजी विद्यार्थी नितीन शहा, उदय शहा, अमर गायकवाड, भीमाशंकर जाधव, प्रशांत घुले, बाळासाहेब म्हेत्रे, मनिषा पाटील, स्वाती लोंढे, सुहास राऊत, मनोज मोरे, सचिन शेंडे, अविनाश बनकर, पराग भाग्यवंत, दीपक घोडके आदींनी प्रयत्न केले.

06220

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १७ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Latest Marathi News Live Updates: कृषी विभागाच्या १३ हजार कर्मचाऱ्यांना लॅपटॉप

Sanjay Dutt: अजय देवगन संजय दत्तचा फॅमिली डॉक्टर? संजय दत्तचे हैराण करणारे खुलासे

SCROLL FOR NEXT