पुणे

इंदापुरात पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल नाही

CD

इंदापूर, ता. १० ः नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्याच दिवशी सोमवारी (ता. १०) प्रत्यक्षात एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर मागाडे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली.
इंदापूर नगर परिषद ‘क’ वर्ग नगरपालिका असून, यंदाच्या निवडणुकीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांमध्ये या पदासाठी चुरशीची स्पर्धा सुरू आहे. मात्र, पहिल्याच दिवशी अर्ज दाखल न होणे हे शहरातील राजकीय वातावरण अद्यापही अनिश्चित असल्याचे द्योतक ठरत आहे. या निवडणुकीत जनतेतून थेट नगराध्यक्ष निवड होणार असून, शहरातील १० प्रभागांमधून २० नगरसेवक निवडले जाणार आहेत. मतदानासाठी २७ केंद्रे निश्चित केली आहेत.
दरम्यान, स्थानिक पातळीवर विविध पक्ष आणि गटांत उमेदवारीबाबत चर्चा सुरू असून, पहिल्या दिवसाचा प्रतिसाद पाहता प्रमुख नेते रणनीती ठरविण्यासाठी आणखी वेळ घेत असल्याचे दिसत आहे. पुढील काही दिवसांत सर्वच राजकीय पक्ष आपले राजकीय डावपेच यशस्वी करीत अर्ज दाखल प्रक्रियेला गती मिळेल, असे चित्र दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Israel-Iran War: इस्राईलचं सैन्य लेबनॉनमध्ये घुसलं! ‘हिज्बुल्लाह’ विरोधात आक्रमक भूमिका; नागरिकांना स्थलांतराचे आवाहन

Pune News : भांडार विभाग साहित्य खरेदी प्रकरणातील आठ अधिकाऱ्यांकडून खुलासा करण्यास टाळाटाळ

Iran america Israel war : इराण-अमेरिका-इस्त्राईल संघर्ष तिव्र होण्याची शक्यता; मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका उडण्याची चिन्हे

Iran-Israel war: 'आता ती वेळ आलीच...', शहबाज-मुनीर यांच्याविरोधात पाकिस्तानमध्ये जनक्षोभ, २६ जणांचा मृत्यू

होळीच्या रंगांवर काळी सावली; नागपूरमध्ये किरकोळ वादातून तरुणाचा मृत्यू, गाडी साईडने चालव म्हणणं जीवावर बेतलं

SCROLL FOR NEXT