पुणे

इंदापुरात रविवारी साधली संधी

CD

इंदापूर : इंदापूर नगर परिषद पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी (ता.१६) नगराध्यक्ष पदासाठी दोन आणि नगरसेवकपदासाठी ५२ असे एकूण ५४ अर्ज दाखल झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सुधाकर मागाडे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमेश ढगे यांनी दिली. यामुळे रविवारी अर्ज भरण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेली संधी प्रशासनासाठी सोमवारचा अंतिम दिवसाचा ताण कमी करणारी ठरली.
इंदापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार रविवार असूनही कार्यालय सुरू होते. यामुळे रविवार नगराध्यक्ष पदासाठी
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कीर्तिकुमार हनुमंत वाघमारे, व तानाजी अनिल देशमुख यांचा अपक्ष असे दोन अर्ज दाखल झाले. यामुळे आज अखेर नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भरत शहा यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महादेव सोमवंशी असे एकूण चार अर्ज दाखल झाले आहेत. तर नगरसेवक पदासाठी रविवारी ५२ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने १४, कृष्णा भीमा विकास आघाडीच्या वतीने २२, काँग्रेस पक्षाच्या वतीने एक तर अपक्ष १५ असे अर्ज दाखल झाले आहेत. तर यापूर्वी आलेले सहा अर्ज असे इंदापूर नगर परिषदेच्या १० प्रभागांमधून निवडून देण्याच्या २० जागांसाठी ५८ अर्ज दाखल झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नेपाळमध्ये निसर्गाचा कहर! भोटेकोशी नदीला महापूर, गाड्या-इमारती क्षणार्धात वाहून गेल्या, धक्कादायक VIDEO समोर...

Electric Short Circuit: राजुरीत शॉर्टसर्किटमुळे दिड एकर ऊस जळून खाक; शेतकरी हाडवळे यांचे लाखो रुपयांचे नुकसान, महावितरणकडून भरपाईची मागणी

IND vs SL: शुभमन गिल पळत गेला अन् हवेत झेपावत घेतला भन्नाट कॅच! श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली, पाहा Video

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

SCROLL FOR NEXT