पुणे

चालकाच्या प्रसंगावधानाने इंदापुरात टळली जीवितहानी

CD

इंदापूर, ता. २० ः शहरातील पुणे- सोलापूर महामार्गावरील एसटी बसस्थानकासमोर गुरुवारी (ता. २०) अपघाताची मोठी दुर्घटना टळली. यावेळी एसटी बस स्थानकाकडे प्रवेश करताना एक दुचाकीस्वार थेट बसच्या चाकाखाली जाण्याच्या स्थितीत आला. मात्र, उपस्थित नागरिकांच्या तत्परतेमुळे आणि बसचालकाने प्रसंगावधान दाखवत वेळीच गाडी थांबविल्याने मोठी जीवितहानी टळली.
या घटनेत दुचाकीचे मोठे नुकसान झाले असून, नागरिकांनी परिसरात गर्दी केली होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि महामार्गावरील इतर वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, या घटनेने बसस्थानक परिसरातील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिस प्रशासनाने बस स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेबाबत कायमस्वरूपी योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT