पुणे

संधी साधू भकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेसाठी एकत्र

CD

इंदापूर, ता. ३० : महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त जोरात आरोप प्रत्यारोप इंदापूरमध्ये सुरू असून कधी एकमेकांची तोंडही न बघणारी,एकमेकांवर राजकीय हल्ला करणारी, नको ती माणसे एकत्र आलेली आहेत. तसेच एकट्या भरत शहाला रोखण्यासाठी एकत्र आलेली ही कृष्णा-भीमा विकास आघाडी नसून कृष्णा-भीमा भकास आघाडी आहे. संधी साधू आघाडीच्या माध्यमातून सत्तेसाठी एकत्र आले आहेत यांच्या भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हाती सत्ता द्या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहो, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
इंदापूर नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत शहा व सर्व नगरसेवक यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी यावेळी कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, अप्पासाहेब जगदाळे, पृथ्वीराज जाचक, जयदीप कवाडे, संजय सोनवणे यांच्यासह अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता द्या इंदापूरचा विकास अधिक वेगाने होणार आहे. भरत शहा यांच्या घरी बसूनच करमाळा आणि इंदापूरला जोडणाऱ्या पुलासाठी ४०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत तत्काळ काम सुरू केले. यामधून शहराचा विकास आणि बाजारपेठ वाढणार आहे.त र दुसरीकडे स्वतः १९ वर्षे मंत्री असलेले विकासाच्या वेळी कुठे होते. फक्त जॅकेट घातलं, स्टाइल मारली फोटो काढायला पुढे पुढे केलं म्हणजे हे काय विकासाचे काम आहे का? बँक, दूध संघ तोट्यात, कर्मयोगी कारखाना चालवायला दिला, नीराभीमा कारखान्यावर कर्जाचा डोंगर याचे तुम्हाला काय वाटत नाही का? तुम्ही तालुक्यात एक तरी काम चांगले केले ते दाखवा, असा सवाल हर्षवर्धन पाटील यांचे नाव न घेता केला. आता स्वतःच्या विधानसभेला एवढा प्रचार केला नाही तेवढे हे तिघे हातात हात घालून प्रचार करत आहेत; मात्र १९ वर्षे तुम्ही मंत्री असताना काय केले उलट साडेतीन वर्ष मंत्री असलेल्या दत्तात्रेय भरणे यांनी प्रशासकीय, नगरपालिका, पीडब्ल्यूडीची, न्यायालयाची इमारत उभी करत शहराच्या वैभवात भर घातली. लाथ मारीन तिथे पाणी काढायची धमक नेतृत्वात असावी लागते. ती धमक माझ्यात, दत्ता भरणे आणि भरत शहा यांच्यात आहे.’’
कृषिमंत्री भरणे म्हणाले, ‘‘आपल्या शहराच्या विकासामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. २०१४ पूर्वीची आपल्या इंदापूर शहराची अवस्था काय होते आणि आज किती विकासात्मक बदल झाला आहे हे सर्वांनी पाहिले आहे. तसेच शहरातील मालोजीराजे गढी व चाँदशावली बाबा दर्गा यांचा विकास आराखडा करून राज्यात हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतीक म्हणून इंदापूर शहराकडे पाहिले जाणार आहे. असाच शहराचा अधिक विकास करायचा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे उभे राहा, असे आवाहन त्यांनी केले.


ज्या विश्वासाने उपमुख्यमंत्री अजित पवार कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे, अप्पासाहेब जगदाळे यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दिली त्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही. आम्ही इंदापूरच्या विकासाचे व्हीजन घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहोत. मागील पाच वर्षांत मिळालेल्या संधीच्या माध्यमातून इंदापूर शहराचा विकास केला आहे कचराकुंडी मुक्त इंदापूर शहर बनवले आहे विरोधकांनी ३० वर्षे केलेली घाण आम्ही पाच वर्षांत काढण्याचे काम केले. आगामी काळात इंदापूर शहर शांततामय भयमुक्त स्वच्छ पारदर्शक कारभार व सुंदर आणि रोड मॉडेल बनवू.
भरत शहा, नगराध्यक्षपदाचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर

6726

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला शिक्षकाकडून बेदम मारहाण; जिल्हा परिषद शाळेतील संतप्त प्रकार, प्रकरण दडपण्याचा प्रयत्न

Junnar Crime : लग्नास नकार; जुन्नरमध्ये विद्यार्थिनीवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, विद्यार्थिनी गंभीर जखमी

Hardik Pandya: हार्दिक पांड्याविरोधात पुणे पोलिसात तक्रार; तिरंग्याचा अवमान केल्याचा आरोप

Cyber Crime : दहा कोटींच्या सायबर फसवणूकप्रकरणी सोलापूरमधून आरोपीला अटक

Monalisa Marriage: मुस्लिम तरुणासोबत लग्न केलं; पण वडिलांची भीती, घाबरलेल्या मोनालिसाची पोलिसात धाव अन्... व्हायरल गर्ल पुन्हा चर्चत

SCROLL FOR NEXT