पुणे

कुराश स्पर्धेत पुणे विभागाचे वर्चस्व

CD

इंदापूर ता. ३० : येथील शहा संस्कृतिक भवनामध्ये शुक्रवार (ता. २८) ते शनिवार (ता. २९) या कालावधीत शालेय राज्यस्तरीय कुराश स्पर्धा झाल्या. यामध्ये राज्यभरातील ३९२ खेळाडूंनी सहभाग घेतला. या स्पर्धेत पुणे विभागाने आपले वर्चस्व कायम राखले. यामध्ये विजेते खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे, पुणे जिल्हा कुराश असोसिएशन व येथील शहा ग्लोबल स्कूल यांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्‍घाटन रोटरी क्लब ऑफ इंदापूरचे अध्यक्ष नितीन शहा, क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी यांच्या हस्ते झाले. यावेळी भीमाशंकर जाधव, कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंखे, क्रॉस असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे फाउंडर संजय धोपावकर, तांत्रिक सचिव दत्तात्रेय व्यवहारे आदी उपस्थित होते. शहा ग्लोबल स्कूलच्या वतीने स्पर्धेचे आयोजन केले.
दरम्यान, उत्तर प्रदेश येथील सहारनपूर या ठिकाणी होणाऱ्या स्पर्धेत पुणे विभागाचे ४८ खेळाडू चार टीम मॅनेजर्स व चार कोच असा संघ महाराष्ट्र राज्यातून सहभागी होणार आहे. या स्पर्धा १५ ते २२ डिसेंबर या कालावधीत पार पडणार आहेत.

Media Ids : IND25B06730

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gas Supply: गॅस कमी लागणारे पदार्थच उपलब्ध करा, इंडक्शन वापरण्याचा हॉटेल संघटनेचा सल्ला

Nagpur Crime : कुख्यात बुकी ‘बोमा’कडून गुंड सुमीत ठाकूरच्या वाढदिवसाचे बॅनर; प्रमुख चौकात झळकले फलक, पोलिसांची कारवाई

Latest Marathi News Live Update : पालकमंत्री प्रकरणी मंत्री भरत गोगावले यांचा वरिष्ठांवर विश्वास

Air pollution Suicide : वाढता उन्हाळा अन् प्रदूषण स्वतःचा जीव घेण्यासाठी करतय प्रवृत्त? धोका ५०% ने वाढला, धक्कादायक रिसर्च पाहा

Weather Update : नाशिककरानो सावधान! रणरणत्या उन्हात आता पावसाचे सावट; 'या' तारखेपासून मेघगर्जनेचा इशारा

SCROLL FOR NEXT