पुणे

आठवडे बाजारामध्ये अपघाताला निमंत्रण

CD

इंदापूर, ता. ८ ः शहरामध्ये दर रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारामधील काही विक्रेते हे पुणे- सोलापूर मार्गावरच बसत आहे. तसेच, आठवडे बाजारासाठी येणाऱ्या नागरिकांकडून रस्त्याच्या दुतर्फा वाहने लावली जात आहेत. नियम पायदळी तुडवले जात असल्याने रविवारचा आठवडे बाजार म्हणजे इंदापूरकरांसाठी अपघाताचे निमंत्रण ठरत आहे.
याबाबत अनेकवेळा लक्ष वेधण्याचा प्रयत्न करूनही नगरपरिषद प्रशासन आणि पोलिस प्रशासनाचे या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असून, इंदापूरकरांचा जीव वेठीस धरला जात आहे. तसेच विक्रेते आणि ग्राहकांचीही गैरसोय होत आहे. यामुळे याबाबत प्रशासनाने गांभीर्याने पाहण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
इंदापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने शहराचा दर रविवारी भरणाऱ्या या बाजारामध्ये मोठी गर्दी होत असते. हा आठवडे बाजार नगरपरिषदेच्या समोर, पाठीमागे व ४० फुटीरस्त्यालगत भरत असतो. यामध्ये मोठी आर्थिक उलाढाल होत असल्याने मोठ्या संख्येने व्यापारीही सहभागी होत असतात. यामधील काही व्यापारी हे महामार्गाच्या लगतच आपले दुकान मांडून बसतात. यामुळे या मार्गावरून होत असलेल्या वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे ग्राहकांनाही खरेदीसाठी अडचण निर्माण होते.
दुसरीकडे आठवडे बाजारामध्ये खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना शहराच्या कोणत्याच भागात हक्काचे वाहनतळ नसल्याने महामार्गाच्या दुतर्फा त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने वाहतुकीचे नियम मोडून उभी केली जातात. यामुळे रस्ता प्रत्यक्ष वाहतुकीसाठी कमी आणि वाहने उभा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. यामुळे वाहतूक कोंडी होत असते. याबाबत इंदापूर नगरपरिषद प्रशासन व पोलिस प्रशासन यांनी संयुक्तरीत्या नियोजन करून याबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.

हॉकर्स व वाहनतळ उभारण्याची गरज 
इंदापूर शहरात बाहेरगावावरून येणाऱ्या वाहन चालक मालकांसाठी वाहनतळाची कोठेही अधिकृत सोय नाही. यामुळे नागरिक मिळेल त्या ठिकाणी आपली वाहने उभी करीत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. यामुळे नगरपरिषद प्रशासनाने वाहनतळासाठी हक्काची जागा उपलब्ध करून वाहनतळ तयार करावे, जेणेकरून नगरपरिषदेलाही त्या माध्यमातून उत्पन्न मिळेल. तसेच शहरातील हातगाडी, पथारीवाले यांनाही एका ठिकाणी व्यावसायिक दृष्टिकोनातून जागा देत हॉकर्स झोन उभा करून शहरातील अतिक्रमणे काढीत छोट्या व्यावसायिकांचेही नुकसान न करता त्यांना हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी.

06773

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Adhav: ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचं निधन, उपेक्षितांच्या लढ्याचा नायक हरपला

Baba Adhav and Politics : प्रचंड लोकप्रियता असूनही बाबा आढाव राजकारणापासून का राहिले दूर?

Indigo Flight: ''खरं कारण काय ते आत्ता सांगता येणार नाही..'', इंडिगोने DGCA ला काय उत्तर दिलं?

Baba Adhav : कशी सुरू झाली होती कष्टाची भाकर? पंतप्रधानांनी घेतला होता आस्वाद, बाबा आढावांची हृदयस्पर्शी आठवण

IND vs SA, T20I: टीम इंडियाचे दोन तगडे शिलेदार तंदुरुस्त होऊन परतले; सूर्याच्या बातमीने द. आफ्रिकेचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT