पुणे

शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेत महाराष्ट्र संघ उपविजेता

CD

इंदापूर, ता. ३१ : सहारनपूर (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय कुराश स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय क्रमांकाचे चषक पटकाविले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने ५ सुवर्ण, ५ रौप्य व ९ कांस्य पदके जिंकत एकूण १९ पदकांची कमाई केली. महाराष्ट्र संघाने आपली कामगिरी कायम राखत राष्ट्रीय स्तरावर दबदबा सिद्ध केला.
उत्तर प्रदेश मधील सहारनपूर येथे झालेल्या स्पर्धेमध्ये कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष अंकुश नागर, महासचिव शिवाजी साळुंखे, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी शिवाजी कोळी यांचे मार्गदर्शन लाभले. तर महाराष्ट्राच्या वतीने तांत्रिक व व्यवस्थापकीय पथकामध्ये महाराष्ट्र संघाकडून आंतरराष्ट्रीय पंच दत्तात्रेय व्यवहारे, टीम मॅनेजर श्रुती पुनगावकर, पंच अमित भोसले, शरद अंदुरे, अनिकेत व्यवहारे, संजय पाटील, आनंद गावडे, राकेश बोगा तर प्रशिक्षक म्हणून जयश्री व्यवहारे, माया कदम यांनी सहभाग घेतला.
दरम्यान सर्व यशस्वी खेळाडू व मार्गदर्शक यांचे इंदापूर नगरपालिकेचे नूतन नगराध्यक्ष भरत शहा तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी अभिनंदन केले.

पदक विजेते खेळाडू
सुवर्णपदक विजेते ः अथर्व मोरे, अजिंक्य नरोटे, वृंदा शेलार, तनया पाटील, वैदेही बाबर

रौप्यपदक विजेते ः आर्यन शेंडे, विश्वजीत पाटील, प्रिन्स सोनवणे, मनस्वी यादव, श्रावणी सावंत
कांस्यपदक विजेते ः आनवी गायकवाड, तेजस्विनी आसबे, तृप्ती कोपनर, ऋचा बोगा, समीक्षा राऊत, ऋतुजा पाटील, सायली खरात, आर्या शिंदे, कार्तिक पाटील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Year: पार्टी ऑल नाईट! महाराष्ट्रात हॉटेल्स-पब पहाटे ५ वाजेपर्यंत खुले राहणार; फक्त एकच अट, पण कोणती?

Confirm Ticket : रेल्वेने बदलला मोठा नियम! कन्फर्म सीट हवी असल्यास आत्ताच करून घ्या 'हे' एक काम..नाहीतर 30 जानेवारीनंतर बसेल फटका

Omraje Nimbalkar यांच्यावर आमदार पुत्राची जहरी टीका, 'शेंबड पोरं' म्हणत पुन्हा डिवचलं | Malhar Patil | Sakal News

थर्टी फर्स्टला हुल्लडबाजांवर पोलिसांची करडी नजर, मुंबई-पुण्यात वाहतुकीत बदल; कोणता रस्ता बंद, पर्यायी मार्ग कोणते? वाचा

Pachod News : कुटुंब नियोजनातही पुरुषांची मक्तेदारी; जबाबदारी मात्र महिलांवरच!

SCROLL FOR NEXT