पुणे

युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे काळाची गरज

CD

इंदापूर, ता. २ ः ‘‘शालेय वयातील मुलेही व्यसनाच्या आहारी जात आहेत. त्यामुळे शालेय जीवनातच व्यसनमुक्तीचे प्रभावी प्रबोधन होणे गरजेचे आहे. युवक पिढी जितकी सशक्त, तितकाच देश सामर्थ्यवान होतो. मात्र, ३१ डिसेंबरला दारू पिण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. याला आळा घालण्याची गरज आहे. युवकांना व्यसनापासून दूर ठेवणे काळाची गरज बनली आहे,’’ असे प्रतिपादन इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.
इंदापूर शहरात देशातील युवा पिढी व्यसनमुक्त, सशक्त व सामर्थ्यवान व्हावी या हेतूने ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने सलग १५व्या वर्षी ‘विधायक ३१ डिसेंबर- दारू नको, दूध प्या’ हा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शहा बोलत होते. या उपक्रमात युवक व नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमानिमित्त लोणी देवकर येथील रचना देशी गो- संवर्धन केंद्राच्या वतीने माजीद पठाण यांच्या माध्यमातून उपस्थित नागरिकांना मोफत सुगंधी दुधाचे वाटप केले. तसेच, गलांडवाडी नं. १ येथील राजीवप्रताप निसर्गोपचार केंद्राचे संचालक प्रताप कदम यांच्या वतीने व्यसनमुक्त युवक संघाची ‘शिवतेज’ दिनदर्शिका मान्यवरांना भेट देण्यात आली.
यावेळी योग व शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे योगरत्न पुरस्कारप्राप्त दत्तात्रेय आनपट, राज्यस्तरीय शालेय शिक्षक योगासन स्पर्धेसाठी निवड झालेले प्रशांत गीड्डे व प्रा. धनंजय देशमुख, तसेच इंदापूर नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमास उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सिद्धार्थ नामपल्ली, गोविंद वृद्धाश्रमाचे दशरथ बुवा महाडीक, भारतीय जैन संघटनेचे धर्मचंद लोढा, माजी सैनिक संघटनेचे मारुती मारकड, कैलास गवळी, वृक्षसंजीवनी परिवाराच्या सायरा आतार, मयूरी पाटील, सारिका रेडके, रचना परिवाराचे माजीद पठाण, व्यसनमुक्त युवक संघाचे सुदीप ओहोळ, तानाजी पाडुळे, बापू गलांडे, माजी मुख्याध्यापक नवनाथ चंदनशिवे आदी उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अस्लम शेख, गणेश कांबळे, ज्ञानदेव डोंगरे, इंद्रनील देशमुख, मंथन माने, सौरव पारवे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक प्रा. धनंजय देशमुख यांनी केले. सूत्रसंचालन शरद झोळ यांनी, तर युवा क्रांती प्रतिष्ठानचे प्रशांत शिताप यांनी आभार मानले.

06859

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

Nashik News : राज्यपाल थेट शेतात उतरले; खोरीपाड्यात ज्वारीची पेरणी करत नैसर्गिक शेतीचा संदेश!

Latest Marathi News Live Update: रिपब्लिकन पक्षाकडे मतांचा साठा असतानाही महायुतीकडून सत्तेचा वाटा मिळत नसल्याची नाराजी

Kannad News : खामगाव शिवारात बिबट्याचा थरार; खुल्या शेडमध्ये बांधलेल्या वासराचा फडशा!

HSRP Deadline Rule: आता दंड की सवलत? अंतिम मुदतीनंतरही HSRP नंबर प्लेट बदलली नसेल तर काय होणार? जाणून घ्या नियम...

SCROLL FOR NEXT