इंदापूर, ता. २२ ः पुणे- सोलापूर महामार्गावर वरकुटे बुद्रुक (ता. इंदापूर) हद्दीत सिमेंटचा टँकर उलटल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोंढे वस्ती आणि वरकुटे बुद्रुक यांच्या दरम्यान
सिमेंटची वाहतूक करणारा टँकर पुणे बाजूकडून सोलापूरच्या दिशेने जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटला. टँकर रस्त्याच्या मधोमध आडवा पडल्याने दोन्ही बाजूंची काही काळ वाहतूक विस्कळित झाली. अपघात इतका भीषण होता की, टँकरच्या केबिनचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आहे. यामध्ये चालक गंभीर जखमी अवस्थेत आत अडकून पडला होता.
यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या प्रवासी आणि स्थानिक तरुणांनी अपघाताचे गांभीर्य ओळखून मदतीसाठी धाव घेतली. केबिन पूर्णपणे दबली गेल्याने चालकाला बाहेर काढणे कठीण झाले होते. वेळ निघून जात असल्याचे पाहून तरुणांनी तत्काळ एका ट्रॅक्टरची मदत घेतली. ट्रॅक्टरच्या साहाय्याने दोरखंड लावून दबलेली केबिन ओढून बाहेर काढली. त्यानंतर अत्यंत सावधगिरीने चालकाला सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. दरम्यान, स्थानिक तरुणांच्या प्रसंगावधान व वेळीच मदतीमुळे चालकाचे प्राण वाचले, तर दुसरीकडे टँकर मुख्य रस्त्यावर आडवा झाल्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन क्रेनच्या साहाय्याने टँकर बाजूला केला. जखमी चालकाला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत इंदापूर पोलिस ठाणे येथे नोंद करण्याचे काम चालू होते.
06975
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.