पुणे

इंदापूरमध्ये ८ अर्ज बाद

CD

इंदापूर, ता. २० : इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ११४ व पंचायत समितीच्या १६ जागांसाठी २१३ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. यामध्ये गुरुवारी झालेल्या छाननीमध्ये जिल्हा परिषदेचा एक आणि पंचायत समितीचे सात अर्ज बाद झाले. अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र, तालुक्यात खरी लढत घड्याळ विरुद्ध कमळ, अशीच असणार हे नक्की झाले आहे.
इंदापूरमध्ये अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या क्षणी मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. यामध्ये कट्टर राजकीय विरोधक असलेले कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एकत्र येत घड्याळाच्या चिन्हावर समर्थकांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यामुळे दोन्ही पक्षातील अनेक इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने नाराजांची संख्या मोठी होती. यावर भाजपच्या वतीने प्रदीप गारटकर व प्रवीण माने यांनी पक्षातील कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीतील नाराजांना बरोबर घेत आव्हान उभे केले आहे. त्यामुळे एकत्र आलेली राष्ट्रवादीची ताकद आणि सज्ज झालेली भाजपची फौज यामुळे निवडणूक रंजक होणार आहे.
या निवडणुकीच्या निमित्ताने नेत्यांनी आपल्या पुढच्या पिढीला राजकारणात आणले. यामुळे नाराजांची संख्या मोठी असून, यामधील अनेक इच्छुकांनी भाजपकडून अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत राष्ट्रवादीला या नाराजांची मनधरणी करावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT