पुणे

भल्या पहाटे धावले हजारो इंदापूरकर

CD

इंदापूर, ता. २७ ः शहराच्या वैभवात भर घालणारा, नागरिकांच्या आरोग्यसदृढतेला चालना देणारा आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा ‘वीरश्री मालोजीराजे भोसले इंद्रेश्वर मॅरेथॉन- सीझन वन’ या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने भल्या पहाटे थंडीची झुळूक अंगावर घेत हजारो इंदापूरकरांनी धावण्याच्या या स्पर्धेत सहभाग घेतला. विविध सामाजिक संघटनांच्या वतीने या मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्यांचे विविध ठिकाणी स्वागत करण्यात आले.
इंदापूर स्पोर्ट्स अँड हेल्थ फाउंडेशनच्या वतीने इंदापूर शहरात प्रथमच मॅरेथॉनसारखा व्यापक क्रीडा- आरोग्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाला नगरपरिषद, पोलिस प्रशासन, तसेच विविध सामाजिक संस्थांचे भक्कम पाठबळ लाभले. आरोग्य जागृतीसोबतच सामाजिक एकोपा वाढविण्यात ही मॅरेथॉन मोलाची ठरली. ‘देशासाठी पळा, आरोग्यासाठी पळा, ग्रामदैवत इंद्रेश्वराचे स्मरण करत पळा आणि वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या शौर्याला अभिवादन करत पळा’, असा प्रेरणादायी संदेश या मॅरेथॉनमधून देण्यात आला. शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षिततेची योग्य खबरदारी आणि सुयोग्य व्यवस्थापन यामुळे स्पर्धेला खेळाडूंसह नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग लाभला. विविध वयोगटांतील धावपटूंनी उत्साहाने सहभाग नोंदवून आरोग्याबाबत सकारात्मक संदेश समाजापर्यंत पोहोचवित धावण्याची स्पर्धा पूर्ण केली.
याप्रसंगी कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्ष भरत शहा,भाजप नेते प्रदीप गारटकर, माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, मुख्याधिकारी रमेश ढगे, पोलिस निरीक्षक विलास नाळे, यांच्यासह क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच, इंदापूर स्पोर्ट्स अँड हेल्थ फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष वाघचौरे, सचिव संदीप जाधव, खजिनदार गोपीनाथ मोरे यांच्यासह सर्व सहभागी, स्वयंसेवक आणि सहकार्य करणाऱ्या यंत्रणांच्या संयुक्त प्रयत्नातून इंद्रेश्वर मॅरेथॉन यशस्वीरीत्या पार पडली.

स्पर्धेतील वयोगटानुसार विजेते (अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय)
१० किलोमीटर धावणे ः पुरुष (१८ वर्षाखालील) - सोमनाथ अंकुश गवळी, समाधान संतोष हागरे, प्रेम विजय धावसे.
१८ ते ४० वर्षे वयोगट- गौरव पवार, पार्थ देविदास सातपुते, आकाश गायकवाड.
४० वर्षांवरील वयोगट- आबासाहेब राऊत, ज्ञानेश्वर घोगरे.
महिला (१८ वर्षाखालील)- रुतुजा सोनबा गिरी.
१८ ते ४० वर्षे वयोगट- पोकळे ज्ञानेश्वरी पोपट, कोमल विठ्ठल गहिरे, माधुरी नामदेव भांडाळकर.
४० वर्षांवरील वयोगट - डॉ. गिरिजा मगर, अनिता प्रदीप राजमाने, वर्षा अनिल नागणे

५ किलोमीटर धावणे- पुरुष
१८ वर्षाखालील- आर्यन वसंत लवटे, अनिश गुंडी, अथर्व महादेव भोंग.
१८ ते ४० वर्षे- अंकित रत्नाम गारग, प्रतीक घोरपडे, प्रसाद अण्णा हराळे.
४० वर्षांवरील - शिवराज पांडे, सुभाष गुलाब गोसावी, रमेश्वर ज्ञानदेव साळे.
महिला (१८ वर्षाखालील) - सानिका दत्तात्रेय लोंढे, सृष्टी सुनील गव्हाणे, चांदणी जानू शिंदे.
१८ ते ४० वर्षे- साक्षी जाधव, करुणा परमेश्वर माखरे, दीक्षा दिवसे.
४० वर्षांवरील- सुनंदा विलास बागल, मनीषा सुभाष माळी.

07006

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महिलांना ऑफिसमध्ये बोलवायचा, नंतर स्वत:चे मूत्र पाजून...; कॅप्टन खरातचा विकृतपणा वाचून तळपायाची आग मस्तकात जाईल

X Down: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' डाऊन! कोट्यवधी युजर्सना तांत्रिक अडचणींचा फटका

कोकणाला डावलून केंद्राचा यूपीला मान! दादर-रत्नागिरी पॅसेंजर बंद, दादर-गोरखपूर ट्रेन सुरू; वर्षानुवर्षांच्या मागणीवर पाणी

Baramati Vidhan Sabha: बारामती पोटनिवडणूक काँग्रेस लढवणार? शरद पवार गटाच्या भूमिकेवर केलं भाष्य

Malegaon Crime : राष्ट्रवादी कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; मारेकरी सीसीटीव्हीत कैद, आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु

SCROLL FOR NEXT