पुणे

इंदापूरमधील यंदाची शिवजयंती मिरवणूक रद्द

CD

इंदापूर, ता. १७ ः दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे इंदापूरमध्ये शिवजयंतीनिमित्त काढण्यात येणारी शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक यंदा काढण्यात येणार नाही, अशी माहिती जयंती महोत्सव कमिटीचे प्रमुख ॲड. राहुल मखरे यांनी दिली. याबाबत माहिती देताना ॲड. मखरे म्हणाले, ‘‘इंदापूर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती ट्रस्ट इंदापूर तालुक्याच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कोरोनाचा काळ वगळता सलग ११ वर्षांपासून साजरी करण्यात येत आहे. परंतु, अजित पवार यांच्या निधनामुळे यंदा शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी शहरातील जेतवन बुद्धविहार (डॉ. आंबेडकरनगर) ते इंदापूर नगरपालिका मैदान येथे काढण्यात येणारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची मिरवणूक व विविध कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय जयंती महोत्सव समितीच्या वतीने घेतला आहे.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIP Investment : FD सोडून आता SIP कडेच लोकांचा कल! 5 मोठी कारणे जी बदलत आहेत बचतीची पद्धत

पाकिस्तानी खेळाडूंवर 'भांडी' घासण्याची वेळ, हॉटेलमध्ये राहण्याचे पैसे नाही भरले अन्... कर्णधाराला संताप अनावर, बोर्डावर केले आरोप

थलायवा रजनीकांत घेणार अभिनयातून निवृत्ती ? शेवटच्या सिनेमाच्या शूटिंग लवकरच सुरु होणार

PAK vs NAM, T20 WC : भारताविरुद्ध भोपळा अन् लिंबूटिंबू संघाविरुद्ध शतक! पाकिस्तानची दुबळ्या संघासमोर मर्दुमकी, २०० धावांचे लक्ष्य

Latest Marathi News Live Update : पुणे - इंदोर महार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

SCROLL FOR NEXT