पुणे

इंदापुरात ४९२६ विद्यार्थी

CD

इंदापूर, ता. २२ : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा रविवार (ता. २२) झाली. यामध्ये इंदापूर तालुक्यातील विविध परीक्षा केंद्रांवर इयत्ता पाचवीच्या ३०१२ व इयत्ता आठवीच्या १९१४, अशा एकूण ४ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती इंदापूर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी नीलेश गवळी यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातून पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता पाचवी) तालुक्यातील विविध शाळांमधील ३०६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५८ विद्यार्थी गैरहजर होते. तर ३००८ विद्यार्थी आणि ऐनवेळी प्रविष्ट झालेल्या ४ अशा एकूण ३०१२ विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता आठवी) तालुक्यातील विविध शाळांमधून १९५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी ३७ विद्यार्थी गैरहजर होते. तर १९१४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेसाठी इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूल येथील परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक म्हणून मुख्याध्यापक संजय सोरटे तर उपकेंद्र संचालक म्हणून मनीषा कांबळे यांनी काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND vs SA: बुमराह-अर्शदीपची भेदक गोलंदाजी; पण मिलर-ब्रेव्हिसच्या जोडीनं द. आफ्रिकेला तारलं; भारतासमोर मोठं लक्ष्य

Pune Crime: दौंडमध्ये ८०५ लीटर गावठी दारू जप्त; राज्य उत्पादन शुल्कची कारवाई, पाेलिसांचा संशय बळावला अन्..

Karad Crime: कऱ्हाडनजीक तीन बांगलादेशी घुसखोरांना अटक; मुढेगावात सहा महिन्यापासून वास्तव्य, बनावट आधारकार्ड अन् बरच काही..

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर दाजीपूर फोंडा घाट परिसरात तुफान पाऊस

Nagpur Crime: पेपरफुटी रॅकेट उघड! नागपूरात शिकवणी संचालकासह विद्यार्थी गजाआड; बरच काही येणार समोर, संशयाची सुई बोर्डाकडे?

SCROLL FOR NEXT