इंदापूर, ता. २५ : धनगर समाज इंदापूर तालुका आणि मल्हार आर्मी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रविवारी (ता. १) धनगर समाज वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. इंदापूर शहरातील गुरुकृपा सांस्कृतिक भवन, दत्तनगर रोड येथे हा मेळावा होणार असून समाजातील युवक-युवती आणि पालकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे उपस्थित राहणार आहेत. तर उद्घाटक म्हणून माजी आमदार रामहरी रुपनवर, प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार रमेश शेंडगे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वासराव देवकाते, धनगर आर्मी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सुरेश कांबळे, इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे, दीपक पांढरे, शिवाजीराव इजगुडे, अमोल भिसे उपस्थित राहणार आहेत.
याशिवाय विविध क्षेत्रातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य जोडीदार मिळावा, समाजातील ऐक्य वृद्धिंगत व्हावे आणि पारंपरिक पद्धतीने परिचयाची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशाने मेळाव्याचे आयोजन केले आहे. मेळाव्यासाठी नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी रणजित सोनवलकर 9960339246 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.