पुणे

इंदापूर बसस्थानकावर प्रवाशांना गुलाबपुष्प देऊन स्वागत

CD

इंदापूर : येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकावर मराठी भाषा गौरव दिन प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून लोणी देवकरचे सरपंच कालिदास देवकर उपस्थित होते. त्यांचा सत्कार सहायक वाहतूक अधीक्षक संजय वायदंडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी यानंतर बसस्थानकावर उपस्थित प्रवाशांना पुष्पगुच्छ देऊन साखर व पेढे वाटण्यात आले. तसेच बसमधील प्रवाशांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी लिपिक प्रिया बनसोडे यांनी काढलेली आकर्षक व भव्य रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. वाहक पूनम ठोसरे यांनी सूत्रसंचालन केले.
या कार्यक्रमास वाहतूक निरीक्षक दत्तात्रेय भोसले, लेखाकार रवींद्र डोके तसेच आगारातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Illegal Transport: महाराष्ट्रात बेकायदेशीर वाहतुकीवर सर्जिकल स्ट्राईक! राज्यव्यापी धडक मोहीम सुरू; अंमलबजावणी कधीपासून?

टॉपची कलाकार आणि कोट्यवधींची कमाई असूनही भाड्याच्या घरात राहते ही अभिनेत्री ; महिन्याचं भाडं वाचून बसेल धक्का !

Protein Benefits: फक्त बॉडीसाठी नव्हे, तर दैनंदिन आरोग्य टिकवण्यासाठीही प्रोटीन अत्यंत गरजेचं! जाणून घ्या कारणे

Horscope : उद्यापासून धनदौलत योग! 'या' 5 राशींचा सुवर्णकाळ सुरू; नोकरी-व्यवसायात मोठी संधी, अडकलेल्या कामात मिळेल नशिबाची साथ

फी न भरल्याने आठवीतील विद्यार्थ्याला परीक्षेस मज्जाव, शाळेच्या कारवाईविरोधात कडक पाऊल उचलण्याचा इशारा, पनवेलमध्ये नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT