पुणे

इंदापूरमधील १२ गावांमध्ये समाधान शिबिराचे आयोजन

CD

इंदापूर, ता. ३ ः महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत इंदापूर तालुक्यात टप्पा क्रमांक एकमधील समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये शनिवारपासून (ता. ७) ते १५ मेपर्यंत इंदापूर शहरासह १२ गावांमध्ये नियोजन केले असून, या शिबिरामध्ये महसूल विभागाशी निगडित कामे गावातच होणार असल्याने या शिबिराबद्दल नागरिकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.
शहराच्या महसूल विभागाच्या वतीने ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत महसूल विषयक सेवा प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी विशेष जनजागृती व प्रसार मोहीम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुरूप छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत तहसील कार्यालय, इंदापूर यांच्या वतीने तालुक्यातील विविध मंडळांमध्ये समाधान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत.
बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुक्यात हे अभियान प्रभावीपणे राबवीत विविध महसूल विषयक प्रकरणे मार्गी लावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जीवन बनसोडे यांनी दिली.

या वेळापत्रकानुसार होणार शिबिर
७ मार्च - इंदापूर व काटी
१४ मार्च - माळवाडी व लाखेवाडी
१० एप्रिल - लोणी देवकर व भिगवण
१७ एप्रिल- पळसदेव व सणसर
८ मे - अंथुर्णे व निमगाव केतकी
१५ मे- लासुर्णे व बावडा

या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक घेण्यात येणार असून, नियोजनानुसार शाळांमधून विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढून जनजागृती करण्यात येणार आहे. अभियानाबाबत फलक लावून नागरिकांना माहिती देण्यात येणार आहे.
- जीवन बनसोडे, तहसीलदार, इंदापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iran-israel conflict: होर्मुझमध्ये ७०० तेल टँकर अडकले! जगात तेल संकटाची भीती; भारताकडे किती दिवसांचा साठा?

Jalna–Jalgaon Project : जालना-जळगाव रेल्वेचा मार्ग मोकळा! ५,८०४ कोटींचा निधी मंजूर; लवकरच भूसंपादन सुरू

Team India Schedule: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर भारतीय संघाचे वेळापत्रक; अफगाणिस्ताननंतर कोणकोणत्या संघाला भिडणार, घ्या जाणून

Mahur News : माहूरमध्ये वाळू माफियांची मुजोरी! पोलिसांना जीवे मारण्याची धमकी देत अंगावर धावून गेले; टिपर मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : ग्रहण काळात मंदिरे बंद ठेवण्याची पौराणिक काळापासून परंपरा, जळगावमधील शेकडो मंदिरे बंद

SCROLL FOR NEXT