पुणे

‘मैत्रीण ग्रुप’चे रौप्यमहोत्सव वर्ष

CD

इंदापूर, ता. ५ : ‘‘जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून इंदापूर येथील ‘मैत्रीण ग्रुप’ला २५ वर्षे पूर्ण होत असून, येणारे वर्ष हे रौप्यमहोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून महिलांना एकत्र आणून सामाजिक, सांस्कृतिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविणाऱ्या या ग्रुपचे कार्य उल्लेखनीय ठरले आहे. यंदाही विविध उपक्रमाचे आयोजन केले आहे,’’ अशी माहिती ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनुराधा गारटकर यांनी दिली.
इंदापूर शहरातील २५ ते ३० महिलांना बरोबर घेत २५ वर्षांपूर्वी अनुराधा गारटकर यांनी मैत्रीण ग्रुपची स्थापन केली. त्यामध्ये ज्येष्ठ महिला मार्गदर्शिका तसेच समाजातील सर्व स्तरातील महिलांना एकत्र आणून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी या संस्थेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.
या ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर विविध सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात पंचमीचा सण, पारंपरिक खेळ भोंडला, नवरात्रोत्सवात दांडिया स्पर्धा, खानाखजाना स्पर्धा, माय-लेक डान्स कॉम्पिटिशन, फोटोग्राफी स्पर्धा, मेकअप स्पर्धा, मॅरेथॉन, रॅली, महिलांसाठी व्यावसायिक प्रशिक्षण, पारायण अशा विविध उपक्रमांचा समावेश असतो.
महिलांच्या आरोग्याचा विचार करून नियमितपणे आरोग्य शिबिरेही आयोजित केली जातात. कॅन्सर तपासणी शिबिर, थायरॉईड टेस्ट, हिमोग्लोबिन तपासणी, डायबिटीज तपासणी अशा विविध मोफत आरोग्य सेवा महिलांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात.

याशिवाय बचत गट आणि घरगुती व्यवसाय करणाऱ्या महिलांना व्यासपीठ मिळावे, यासाठी विविध स्टॉलचे आयोजन केले जाते. महिलांना आनंद आणि मनोरंजन मिळावे यासाठी ऑर्केस्ट्रा, नाट्यप्रयोग व व्याख्यानांचेही आयोजन केले जाते.
हा ग्रुप गेली सलग २५ वर्षे एकाच विचाराने कार्यरत राहिला आहे. या यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्षा गारटकर, अध्यक्षा रसिका देशपांडे, खजिनदार अंजली बाब्रस तसेच सर्व सभासद मैत्रिणींना जाते.
या सर्व उपक्रमांमध्ये प्रदीप गारटकर मित्र परिवाराचे मार्गदर्शन लाभते, अशी भावना या वेळी गारटकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, यांच्या रौप्यमहोत्सवी वर्ष प्रारंभानिमित्त शुक्रवारी (ता. ६) गॅलेक्सी हॉस्पिटल, पुणे, कृष्णा डायग्नॉस्टिक सेंटर पुणे व मैत्रीण ग्रुप यांच्या वतीने डॉ. हेगडे यांच्या संजीवनी हॉस्पिटल येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर यांसह कला स्पंदन नृत्य स्पर्धा, होम मिनिस्टर मनोरंजक खेळ, सुमधुर गीतांचा कार्यक्रम तसेच सोमवारी (ता. ९) आनंद मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti Conversion: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायद्याला मंजुरी; सक्तीचे धर्मांतर आणि लव्ह जिहादवर लगाम लागणार

Latest Marathi News Live Update : एसटी चालक आणि वाहकांची अल्कोहोल तपासणी बंधनकारक

Nashik Water Pipeline : पंचवटीत खासगी कंपनीचा आडमुठेपणा! मुख्य पाईपलाईन फोडली, होळीच्या सणाला नागरिकांचे हाल

Teacher Mobile Ban : अध्यापनावेळी शिक्षकांच्या मोबाईल वापरास निर्बंध; हेरवाडमधील कन्या शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय, मोबाईल जमा करण्याचे बंधन

Thane News: मुंबई-ठाणे-कल्याण प्रवास सुसाट होणार! खाली रस्ता, मध्यभागी उड्डाणपूल आणि वर मेट्रो धावणार, जाणून घ्या संपूर्ण प्लॅन

SCROLL FOR NEXT