पुणे

‘महिलांच्या योजनांसाठी नगरपरिषद कटिबद्ध’

CD

इंदापूर, ता. ८ : ‘‘शासनाच्या वतीने महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असतात. त्यांचा अधिकाधिक महिलांना लाभ घ्यावा. यासाठी नगरपरिषद कटिबद्ध आहे. महिलांनी या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपला आणि आपल्या कुटुंबाचा विकास साधावा,’’ असे आवाहन इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी केले.
इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम, कार्यक्रमांची रेलचेल होती. महिलांच्या आरोग्याची काळजी, कलागुणांना व्यासपीठ तसेच महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आरोग्य तपासणी शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बचत गटांच्या उत्पादनांचे स्टॉल असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
महिला दिनाच्या कार्यक्रमप्रसंगी नगराध्यक्ष भरत शहा, गटनेते शकील सय्यद, महिला व बालकल्याण सभापती मयूरी उंबरे, उपसभापती सुनीता नलवडे, नगरसेविका दीप्ती राऊत, सुनीता वाघ, अनिता ढावरे, वंदना शिंदे, शीतल शेटे, शकिला बागवान, नगरसेवक उमेश मखरे, अक्षय सूर्यवंशी, शुभम पवार, सागर अरगडे, विरोधी पक्षनेते अनिल पवार, सुधाकर ढगे, गणेश राऊत, नागनाथ शिंदे, रमेश ढगे, अंकिता शहा यांच्यासह आजी माजी नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नगरपरिषदेच्या सर्व महिला सफाई कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ही तपासणी आपला दवाखाना, सोनाई नगर (इंदापूर) येथील वैद्यकीय पथकाने केली. त्यानंतर सायंकाळी नगरपरिषदेच्या वतीने महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम तसेच ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते.
महिलांनी लावलेल्या स्टॉलमध्ये कुरडया, पापड्या, व्हेज मंचुरियन, थालपीठ-धपाटे, वडापाव, पाणीपुरी तसेच महिलांनी तयार केलेल्या कपड्यांच्या वस्तूंची विक्री करण्यात आली.
यावेळी बोलताना मुख्याधिकारी रमेश ढगे म्हणाले, शासनाच्या विविध योजनांचा लाभ नगरपरिषदेच्या माध्यमातून महिलांपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शहरामध्ये चालू वर्षात २५ बचत गटांना सुमारे ७० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.

रश्मी बारस्कर यांनी प्रास्ताविक तर अल्ताफ पठाण यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष ओहोळ यांनी आभार मानले.

07204

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup: १० वर्ष तू स्वतःला कुठे पाहतोस? वडिलाचं स्वप्न सॅमसनने पूर्ण केलं... म्हणाला, 'टीम इंडियाचा बेस्ट खेळाडू...'

Beed Crime Attack : बीडमध्ये लोखंडी रॉडने तरुणाला अमानुष मारहाण; हाताच्या हाडाचे झाले तीन तुकडे, पाठ-छातीवर धारदार शस्त्राने वार

Life Astrology : 'या' खास राशींच्या लोकांची जीवनरेखा असते 80 वर्षांपेक्षा जास्त, वृद्धत्वावर करतात मात

Mumbai: मुंबईत फेरीवाले दिसणं कायमचं बंद होणार, महापालिकेचा कारवाईसाठी आक्रमक पवित्रा

अपघातात २ कोटींच्या BMWचा चुराडा, जखमी अवस्थेत अडकून पडले; उद्योगपतीचा मृत्यू, चालक गंभीर

SCROLL FOR NEXT