पुणे

इंदापुरात महसूल कर्मचाऱ्यांचे ''लेखणी बंद''

CD

इंदापूर, ता.१० : इंदापूरचे तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी जीवन बनसोडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तालुक्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. १०) ''लेखणी बंद'' आंदोलन केले. आरोपी संतोष रामदास मोरे याला तत्काळ अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करत कर्मचाऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.
तहसीलदार जीवन बनसोडे निमगाव केतकी-पिटकेश्वर मार्गावर मुरूम वाहतुकीच्या वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी संतोष मोरे याने बुलेट आडवी लावून त्यांच्या कामात अडथळा आणला. यावेळी मोरे याने तहसीलदारांकडे खंडणीची मागणी करत त्यांना मारहाण केली. या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सकाळी १० वाजल्यापासून काम बंद ठेवले. या आंदोलनाला अन्य शासकीय विभागांनीही पाठिंबा दिला. साहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत यांनी कर्मचाऱ्यांचे निवेदन स्वीकारून कारवाईचे आश्वासन दिले.

कायद्याचा धाक उरलाय का?
इंदापुरात तहसीलदारांवर हल्ला होण्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी २२ ऑगस्ट २०२५ रोजी बाभूळगाव येथे अतिक्रमण मोहिमेदरम्यान बनसोडे यांच्यावर हल्ला झाला होता, त्याप्रकरणी १५ ते २० जणांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यापूर्वी २४ मे २०२४ला तत्कालीन तहसीलदार श्रीकांत पाटील हे प्रशासकीय भवनाकडे जात असताना संविधान चौकाजवळ मोटारीमधून आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्या वाहनावर हल्ला करून वाहनाची नासधूस केली होती. तसेच चालक व तहसीलदार यांच्या अंगावर मिरचीची पूड टाकून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी प्रसंगावधान राखल्याने तहसीलदार व चालक बचावले होते. यावेळी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे महसूल विभागात संतापाचे वातावरण असून, गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कायमस्वरूपी जरब बसवण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफी अपडेट! कर्जमाफीची प्रक्रिया सुरू: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अंतर्गत मतभेदांमुळे ‘इंडिया’चे नेते अस्वस्थ

Trinamool Congress: ‘तृणमूल’मधील फुटीचे लोण दिल्लीपर्यंत; वीस खासदारांचा वेगळा गट, ‘एनडीए’ला पाठिंब्यासाठी पत्र

निर्णय मुख्यमंत्र्यांच्या हाती! सोलापूरच्या ‘आयटी पार्क’ची जागा कृष्णा खोरे नियामक मंडळाच्या ३० वर्षांच्या धोरणात अडकली; अभियंत्यांच्या निशिबी प्रतीक्षा

आजचे राशिभविष्य - 09 जून 2026

तिखट-चटपटीत मसाले आणि वितळलेलं चीज; हा 'बेल पेपर टोस्ट' सकाळपासून संध्याकाळपर्यंत ठरतो परफेक्ट स्नॅक

SCROLL FOR NEXT