पुणे

इंदापूरमध्ये भल्या पहाटे योगमय वातावरण

CD

इंदापूर, ता. १० : पतंजली योगपीठ, हरिद्वारच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर येथे आयोजित तीन दिवसीय मोफत इंटिग्रेटेड योग शिबिरास मंगळवारी उत्साहात प्रारंभ झाला. पहाटेपासूनच शहरात योगमय वातावरण निर्माण झाले होते. हजारो इंदापूरकरांनी या शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
पतंजली योग समिती आणि महिला पतंजली योग समिती, इंदापूर यांसह भारत स्वाभिमान आणि पतंजली किसान सेवा समिती यांच्या वतीने इंदापूर येथील प्रशासकीय भवनालगत असलेल्या प्रांगणात हरिद्वार पतंजली योगपीठचे मुख्य केंद्रीय प्रभारी प. पु. स्वामी परमार्थदेव यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार (ता. १०) ते गुरुवार (ता. १२) या कालावधीत तीन दिवस इंटिग्रेटेड मोफत योग शिबिर आयोजित केले असून याच्या शुभारंभप्रसंगी शेकडो योगप्रेमी पहाटेपासूनच मैदानावर जमले होते. सामूहिक योग, प्राणायाम आणि ध्यानाच्या विविध प्रकारांमुळे परिसरात उत्साही वातावरण निर्माण झाले होते.

यावेळी राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने, इंदापूरचे नगराध्यक्ष भरत शहा, माजी नगराध्यक्ष अंकिता शहा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासह हजारो इंदापूरकरांनी स्वामी परमार्थदेव यांच्या मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला. यामुळे सर्वत्र योगमय वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान या शिबिराच्या पूर्वसंध्येला स्वामी परमार्थदेवजी यांचे इंदापूर शहरात ढोल-ताशांच्या गजरात भव्य स्वागत केले. फुलांची उधळण आणि पायघड्या घालून त्यांचे स्वागत केले होते.
यावेळी बोलताना इंदापूर पतंजली योग परिवाराचे प्रमुख दत्तात्रेय अनपट म्हणाले, ‘‘योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून मानसिक स्वास्थ्य, तणावमुक्त जीवन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. या शिबिरातून नागरिकांना नियमित योगाचा अनुभव मिळणार असून निरोगी जीवनशैली अंगीकारण्याची प्रेरणा मिळेल.’’
दरम्यान, दोन दिवस चालणाऱ्या या शिबिराचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PBKS vs RR Live: दे दणादण! वैभव सूर्यवंशीने पंजाबच्या गोलंदाजांचा केला पालापाचोळा; ८ चेंडूंत ४२ धावा, IPL 2026 मध्ये रचला इतिहास

Pune News : १०० दिवसात नागरी हितापेक्षा भ्रष्टाचाराला प्राधान्य; सत्ताधारी भाजपवर काँग्रेसची टीका

यवतमाळ हादरलं! अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा झोपेतच गेम; छतावर चढून कुर्‍हाडीने सपासप वार

विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाला मिळाली संधी? वाचा यादी...

Harihar Panchamasali Math Controversy : पंचमसाली मठात हायव्होल्टेज ड्रामा! वचनानंद स्वामी आणि ट्रस्टींमध्ये जुंपली; कोट्यवधींच्या हिशेबावरून तीव्र वाद

SCROLL FOR NEXT