पुणे

इंदापुरात शंभू महादेव कावडीची महाआरती

CD

इंदापूर, ता. २७ ः इंदापूर शहरात शिवभक्तांच्या उपस्थितीत शंभू महादेवाच्या कावडीची महाआरती उत्साहात पार पडली. शहरातील ऐतिहासिक व मानाची समजली जाणारी पांडुरंग (तात्या) शिंदे बंधूंची कावड सोहळा यंदाही दिमाखात साजरा झाला.
शिंदे बंधूंची कावड ही इंदापूरच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग असून, ती अत्यंत मानाची मानली जाते. यंदा या सोहळ्यावेळी पारंपरिक ढोल-ताशा, हलगी यांच्या गजरात परिसर दणाणून गेला होता. भाविकांच्या जयघोषामुळे वातावरण शिवमय झाले होते. भाविकांनी कावडीच्या दर्शनासाठी गर्दी केली होती.
या कार्यक्रमाला कर्नाटक येथील बालेवाडी मठाचे पीरयोगी सिंगनाथाजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी कावडीचे दर्शन घेऊन विधीपूर्वक महाआरती केली. महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची व्यवस्था पांडुरंग शिंदे बंधू व स्थानिक कार्यकर्त्यांनी सांभाळली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : एम्प्रेस गार्डनच्या जागा हस्तांतरणाला विरोध; हरित वारशाच्या रक्षणासाठी जनआंदोलन उभारण्याचे आवाहन

अंदाज चुकला अन्‌ दुचाकीवरील दोघे ट्रकखाली! सोलापुरातील जुना बोरामणी नाका चौकात भीषण अपघात, स्वयंपाकाची ऑर्डर घ्यायला जाताना दोघे ठार, वाचा...

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

Katraj News : भारती विद्यापीठ भागात हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे भडका; चारजण जखमी

SCROLL FOR NEXT