इंदापूर, ता. ८ : इंदापूर नगरपरिषदेने ऐतिहासिक निर्णय घेत ‘वन स्ट्रोक’ पद्धतीने कर्मचाऱ्यांच्या थकीत देयकांचा प्रश्न मार्गी लावला आहे. नगराध्यक्ष भरत शहा यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १ कोटी ५७ लाख ५४ हजार ८४० रुपयांचे वितरण करण्यात आले.
नगरपरिषदेतील ४१ नियमित कर्मचाऱ्यांना फरकाची ८० लाख ९३ हजार ८३३ रुपये, तर ८ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युइटी व रजा रोखीकरणापोटी ६४ लाख ६ हजार ३५० रुपये देण्यात आले. याशिवाय २९ सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना १२ लाख ४९ हजार ६५७ रुपयांच्या फरकाची रक्कम सुपूर्त करण्यात आली. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली देयके मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
यावेळी नगराध्यक्ष भरत शहा म्हणाले की, ‘‘उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे आणि अप्पासाहेब जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराच्या विकासासोबतच कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले आहे.’’
याप्रसंगी मुख्याधिकारी रमेश ढगे, सर्व नगरसेवक व अधिकारी उपस्थित होते.
07339
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.