पुणे

इंदापूर पॉलिटेक्निकच्या गुणवंतांचा गौरव

CD

इंदापूर, ता. ११ ः येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या पॉलिटेक्निक महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम पार पडला. या वेळी क्रीडा क्षेत्रातील विभाग स्तरावरील विजेते, विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयीन स्तरावरील स्पर्धांमध्ये विजय मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच, प्रत्येक विभागातील विद्यार्थ्याला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. वैभव काशीद, सुरज भोसले, मयुरी पिसाळ, सिध्दी रोकडे, गितांजली भगत यांचा त्यामध्ये समावेश होता.
या प्रसंगी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाला ‘बेस्ट परफॉर्मिंग डिपार्टमेंट ऑफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्राची भांडारे हिला संपूर्ण संस्थेमधून ‘इन्स्टिट्यूट लेव्हल बेस्ट आऊटगोइंग स्टुडंट’ म्हणून गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी इंदापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन खुडे, अनंतराव पवार इंजिनिअरिंग कॉलेजचे मेकॅनिकल अभियांत्रिकीचे विभागप्रमुख प्रा. कोंढाळकर, राहुल मखरे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोनाली काळे यांनी केले. प्रा. सोमनाथ चिकणे यांनी प्रास्ताविक केले. तर, प्रा. दिनेश सावंत यांनी आभार मानले. प्रा. लक्ष्मीकांत लाकाळ, प्रा. डॉ. संजय कदम यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Salary Hike : आठवा वेतन आयोग लागू झाल्यास फरक मिळणार? कोणाला किती पगार वाढणार जाणून घ्या आकडेवारी

SRH vs PBKS Live: अभिषेक शर्माची क्रांती! IPL मध्ये कोणालाच न जमलेला पराक्रम केला; वैभव सूर्यवंशी या विक्रमात पाचव्या क्रमांकावर

Yuzvendra Chahal पुन्हा वादात! कार चालवत असतानाच रस्त्यात फेकली सिगारेट अन् मग... Video Viral

अपडेटनंतर मोबाईल होत आहेत निकामी; सतत हँग होऊन अनेक अडचणी; ग्राहक चिंतेत, पाहा तुमच्याकडे 'हा' फोन आहे का?

Nashik child death accident : खेळता खेळता पाण्याच्या टाकीत डोकावला अन्... नको तेचं घडलं, १८ महिन्यांच्या शौर्यचा करून अंत

SCROLL FOR NEXT