संतोष आटोळे ः सकाळ वृत्तसेवा
इंदापूर, ता. १२ : नगरपरिषदेने कोट्यवधी रुपये खर्चून विकसित केलेला शहरातील एकमेव भार्गवराम बगीचा सध्या प्रशासकीय दुर्लक्षामुळे दुरवस्थेत आहे. देखभालीअभावी कारंजे बंद असून, परिसरात साचलेल्या पाण्यामुळे बागेला तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
शहरातील लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळ्याचे केंद्र म्हणून हा बगीचा उभारला होता. मात्र, सध्या येथे मद्यपींचा वावर वाढला असून, प्रेमी युगुलांचाही राबता वाढल्याने सामान्य नागरिकांनी बागेकडे पाठ फिरवली आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही नियोजनाच्या अभावामुळे बागेची अवस्था बिकट झाली असून, नगरपरिषदेने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी इंदापूरकर करत आहेत. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण देखभाल न झाल्यास भविष्यात हा बगीचा केवळ नावापुरता उरेल, अशी भीतीही व्यक्त होत आहे.
स्वच्छतेकडे दुर्लक्ष
बागेत अनेक ठिकाणी गवत वाढले आहे
बसण्याची बाकडे मोडकळीस
कुंपणाची दुरवस्था
झाडे व फुलझाडांच्या देखभालीकडे दुर्लक्ष
मूलभूत सुविधांचा अभाव
जॉगिंग ट्रॅकच्या दुरुस्तीचा अभाव
मुलांच्या खेळण्यांची दुरवस्था
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था मर्यादित
स्वच्छतागृहांची दुरवस्था
लाइटची अपुरी व्यवस्था
सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
संध्याकाळच्या वेळी काही गैरप्रकार घडत असल्याच्या तक्रारीही स्थानिक नागरिकांनी केल्या आहेत. काही वेळा तळीराम किंवा गर्दुल्यांची वर्दळ दिसून येत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. बागेत सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणीही होत आहे.
भार्गवराम बगिच्याच्या देखभाल दुरुस्तीबाबत प्रशासनाला योग्य त्या सूचना देऊन इंदापूरकरांना चांगल्या सुविधा देण्यासाठी नगरपरिषदेच्या वतीने प्रयत्नशील राहू.
- भरत शहा, नगराध्यक्ष, इंदापूर
बागेतील काही सुविधा दुरुस्त करण्याचे नियोजन केले असून, आवश्यक कामे लवकरच करण्यात येतील. नागरिकांसाठी बाग अधिक आकर्षक आणि सुरक्षित करण्यासाठी पुढील काळात सुधारणा केल्या जातील.
- रमेश ढगे, मुख्याधिकारी, इंदापूर
07346
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.