पुणे

महात्मा फुले जयंतीनिमित्त इंदापुरात मिरवणूक

CD

इंदापूर, ता. १२ : शहरात महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासह विविध चौकांमध्ये मान्यवरांनी अभिवादन करत कृतज्ञता व्यक्त केली. सकाळी दुचाकी रॅली आणि सायंकाळी आकर्षक मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी डीजेच्या तालावर ठेका धरत सहभाग नोंदवला. सकाळी सावतामाळीनगर येथून मोटारसायकल रॅलीला प्रारंभ झाला. युवकांनी हातात निळे-पिवळे झेंडे घेत आणि महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करत शहरातून संचलन केले. सायंकाळी निघालेल्या मुख्य मिरवणुकीत पिवळे फेटे परिधान केलेल्या महिलांचा सहभाग लक्षवेधी ठरला. यावेळी नगराध्यक्ष भरत शहा, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, प्रदीप गारटकर यांच्यासह विविध आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञता व्यक्त केली. दिवसभर शहरात सामाजिक एकात्मतेचे आणि उत्साहाचे वातावरण होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway : कोकणवासीयांचा जीव टांगणीला! मंत्री गडकरींनी दिलेली डेडलाईन संपणार; मुंबई-गोवा हायवे पूर्ण होण्यासाठी अजून किती महिने वाट पाहावी लागणार?

ना शुभमन गिल, ना सूर्यकुमार... Asian Games साठीच्या संभाव्य भारतीय संघाच्या यादीतून नावं गायब; जाणून घ्या कारण

आता काकूंची जिरणार! स्वानंदीसमोर येणार चिंगी गरोदर असल्याचं सत्य; ऐन लग्नात राजवाडेंच्या सुनेचा रुद्रावतार

Abhishek Banerjee Attacked : पश्चिम बंगालमध्ये खळबळ! TMC खासदार अभिषेक बॅनर्जींवर थेट जमावाकडून हल्ला; 'चोर चोर'च्या घोषणा देत बेदम मारहाण, अंडी-दगडंही फेकली

Mumbai Crime: पुण्यातील विषारी दारुचे धागेदोरे भिवंडीत, तुकाराम मुंढेंची मोठी कारवाई; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT