इंदापूर, ता. १५ : इंदापूर अर्बन बँकेच्या माध्यमातून समाजातील आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणले जात आहे. आगामी काळात बँकेच्या शाखांचा विस्तार केला जाणार आहे. यंदा २०० कोटी रुपये ठेवीचे उद्दिष्ट असून, बँकेकडून या वेळी १० टक्के लाभांश देण्यात येणार आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
इंदापूर अर्बन बँकेची २९वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या नव्याने नामकरण केलेल्या भाग्यवर्धन सभागृहात हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बॅंकेचे अध्यक्ष गोविंद रणवरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. याप्रसंगी अविनाश घोलप, विलास वाघमोडे, लालासाहेब पवार, राजवर्धन पाटील, उदयसिंह पाटील, बाळासाहेब मोरे, सुभाष काळे उपस्थित होते. अध्यक्ष रणवरे यांनी प्रास्ताविकामध्ये बँकेच्या वाटचालीची माहिती दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी आर्थिक अहवाल सादर केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, ‘‘बँकेने ग्राहकांना डिजिटलच्या माध्यमातून आधुनिक सोयी सुविधा देण्यासाठी संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांनी प्रयत्न करावा. बँकेचा विस्तार वाढण्याचा आहे. त्या दृष्टीने टेंभुर्णी, नातेपुते, माळशिरस, लोणी काळभोर व भिगवण येथे शाखा विस्तार करण्याचा मनोदय असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. अर्थकारणात जो विश्वास लागतो, तो बँकेने कमावला असून, तो अधिक सक्षम करावा.’’
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष मनोज मोरे, संचालक सत्यशील पाटील, लालासाहेब सपकळ, भागवत पिसे, अविनाश कोतमिरे, मच्छिंद्र शेटे पाटील, स्वप्नील सावंत, संजय जगताप, सुभाष बोंगाणे, डॉ. मिलिंद खाडे, डॉ. अश्विनी ठोंबरे, डॉ. दीपाली खबाले, अशोक शिंदे, तानाजी निंबाळकर, हनुमंत काजळे, विजय पांढरे, ॲड. माधव शितोळे, सी.ए. प्रशांत भिसे, ॲड. गिरीश शहा, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते. रघुनाथ पन्हाळकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक सुभाष बोंगाणे यांनी आभार मानले.
यावेळी बँकेच्या वतीने नीरा भीमा कारखान्याला राष्ट्रीय स्तरावरचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष हर्षवर्धन पाटील व संचालक मंडळाचा सत्कार केला. तसेच, बँकेस सहकार्य करणारे ठेवीदार व खातेदार यांचाही यावेळी विशेष सन्मान केला. तर, सभा सुरू असतानाच लाभांशाचे एसएमएस वाजल्याने सभासदांनी आनंद व्यक्त केला.
चार संस्थांच्या एकत्रित सभा
यावेळी इंदापूर अर्बन बँकेसह इंदापूर तालुका दूध संघ, हर्षवर्धन पाटील मोटर वाहतूक संघ, इंदापूर तालुका द्राक्ष प्रक्रिया व वायनरी सहकारी संस्था याच्याशी सर्वसाधारण सभा एकत्रित पार पडल्या.
इंदापूर अर्बन बँकेची वाटचाल
स्थापना- १९९७, सभासद- ६ हजार ६६४, वसूल भागभांडवल- ६ कोटी ६५ लाख, बँकेचा निधी- ३६ कोटी ८१ लाख, ठेवी- १५३ कोटी ४४ लाख,
कर्जे- ११० कोटी ९७ लाख, खेळते भांडवल- २०१ कोटी १८ लाख, एकूण व्यवसाय- २६४ कोटी ४२ लाख, निव्वळ नफा- २ कोटी २४ लाख, लेखापरीक्षण वर्ग- अ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.