पुणे

जेजुरीत खड्ड्यात वृक्षारोपण करून गांधीगिरी

CD

जेजुरी, ता.२ : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सोमवारी (ता.१) बहुजन हक्क परिषदेच्या वतीने पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील जेजुरी कडेपठार कमानीसमोर असलेल्या चेंबरच्या खड्यामध्ये म्हसोबाची स्थापना आणि वृक्षारोपण करण्यात आले. अनोख्या पद्धतीने गांधीगिरी करत जेजुरी नगरपालिकेचे लक्ष वेधण्यात आले.
राष्ट्रीय महामार्गावर जेजुरी नगरपालिका हद्दीमध्ये कडेपठार कमानीसमोर पाइपलाइनचे दोन व्हॉल्व्ह चेंबर आहेत. गेली कित्येक महिन्यांपासून यावरील झाकणे फुटून सुमारे एक फुटांचे दोन खड्डे पडले आहेत. गर्दीच्या वेळी महामार्गावरून जाणारे वाहन यामध्ये अडकतात तर दुचाकीचे अपघात झाले आहेत.
याबाबत नगरपालिकेकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. स्वच्छता ठेकेदार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांना सुद्धा येथील ग्रामस्थांनी सूचना केल्या होत्या. मात्र, टेंडर दिलेले आहे, झाकणे मागवण्यात आली आहेत. लवकर दुरुस्त होतील, अशी मोघम उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडून दिली जात होती. दरम्यान, वाहतूक कोंडीचा सामना करताना रविवारी (ता.३०)
दुचाकीवरील एक जोडपे या खड्ड्यात पडले. ही गंभीर बाब बहुजन हक्क परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत दोडके यांना समजताच त्यांनी खड्याभोवती रांगोळी काढत विधिवत म्हसोबाची
स्थापना तर दुसऱ्या खड्ड्यात वृक्षारोपण करत नगरपालिकेचे लक्ष वेधले.
यावेळी रत्नदीप दोडके, उद्योजक विजय झगडे, सागर दरेकर, ऋषिकेश दरेकर, अक्षय खवळे, विजय लोंढे, अजय भिसे, महादेव झोबाडे, रोहित भोंडे, पंकज दाबेराव आदी
कार्यकर्ते उपस्थित होते.

01828

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nehal Modi: नीरव मोदीचा भाऊ नेहल मोदीला अटक; पंजाब नॅशनल बँक घोटाळाप्रकरणी मोठी कारवाई, पुढील कारवाई काय?

IND vs ENG 2nd Test: रिषभ पंतची ट्वेंटी-२० स्टाईल फटकेबाजी! इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई करून रचला इतिहास, चेंडूसह बॅटही हवेत...

Sanaswadi Fire : इंडिका कंपनीला आग! संपूर्ण गावात आग आणि धूर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Sunil Tattkare : महाराष्ट्राची आर्थिक स्थिती उत्तम; निधी वाटपावरून तटकरेंनी फेटाळले कुरबुरीचे आरोप

Badlapur Firing Case : बदलापूर फायरिंगमधील देशी पिस्तूल, मोटरसायकल हस्तगत; एकाला अटक

SCROLL FOR NEXT