पुणे

जेजुरीत बालचमुंच्या दिंडीतून पर्यावरणाची जागृती

CD

जेजुरी, ता. ६ : येथील छत्रपती शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांनी वृक्ष दिंडी काढत बालचमुंनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.
विद्यालयाच्यावतीने विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम दरवर्षी राबवले जातात. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंडी सोहळ्यानिमित्ताने या शाळेतील चिमुकल्यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी पर्यावरणातील विठ्ठल शोधू या संकल्पनेवर आधारित वृक्षदिंडीचा सोहळा आयोजित केला होता. यामध्ये विविध पर्यावरण रक्षणाचे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी हातामध्ये घेऊन पर्यावरण जनजागृती केली. तसेच झाडांची प्रतिज्ञा ही एक अपरिचित संकल्पना विद्यालयाच्या वतीने
राबवली गेली. झाडांचे महत्त्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना पटवून सांगण्यात आले.
विद्यालयातील विद्यार्थी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत जनाबाई तसेच वासुदेवाच्या भूमिकेत आले होते. गोलाकार रिंगण करून विद्यार्थ्यांनी ज्ञानोबा माउली तुकाराम या अभंगाचा गजर केला तसेच विद्यार्थ्यांनी उपस्थित पालकांना वृक्ष भेट देऊन त्यांना वृक्ष लागवडीचा संदेश दिला. यावेळी मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त मंगेश घोणे, मार्तंड देव संस्थांचे व्यवस्थापक सतीश
घाडगे, सामाजिक कार्यकर्त्या सुभद्रा झगडे, श्लोक हरिश्चंद्रे उपस्थित होते.
या कार्यक्रमाची संकल्पना संस्थेचे संस्थापक श्रीकांत पवार, विद्यालयाच्या संचालिका प्रियंका पवार, पूजा राजपुरे, वैशाली जगताप, रिंकू सिंग, ज्योती कुदळे, सेविका पल्लवी, अशोक शिंदे, प्रशिक्षक प्रदीप खेडेकर, निशांत शिंदे यांनी वारीचे नियोजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT