पुणे

जिल्हा परिषद शाळेतील मुलींसाठी ‘सायकल बँक उपक्रम

CD

जेजुरी, ता. ३ : जिल्हा परिषद शाळेतील मुलींना शिक्षणाप्रति प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थिनींसाठी ‘सायकल बँक’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. मुलींचे शिक्षण टिकवण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे पुरंदरच्या गटविकास अधिकारी प्रणोती श्रीश्रीमाळ यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये इयत्ता ५ वी ते ८ वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींना घरापासून २-३ किलोमीटर पायपीट करत शाळा गाठावे लागते. शाळेस जाण्यास साधन नसल्याने त्यांच्या शिक्षणात अडथळा येतो. या अडचणीवर मात करण्यासाठी व मुलींना शाळेपर्यंत जाण्यासाठी ‘सायकल बँक’ उपक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार गावातील दानशूर व्यक्ती, पालक, शिक्षक, तरुणमंडळ, समाजसेवक, उद्योगपती, शासकीय अधिकारी, कर्मचारी, विविध संस्था, संघटना, मंडळ यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेत १५ ऑगस्ट म्हणजेच स्वतंत्र दिन कार्यक्रमात सायकल दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, पंकज पाटील ९४०४४२१४२७ यांचेशी संपर्क करता येणार आहे, असे पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल यांनी केले.


‘सायकल बँक’ उपक्रमांतर्गत जमा होणाऱ्या सायकली जिल्हा परिषद शाळेतील शिक्षण पूर्ण होईपर्यंत मुलींना वापरता येतील. नंतर त्या ‘सायकल बँके’त जमा करून पुढील वर्षी नव्याने ५ वीत येणाऱ्या मुलींना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे मुलींचा शाळेपर्यंतचा प्रवास सुखकर होईल.
- गजानन पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT