जेजुरी, ता. १९ : जेजुरीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने दहीहंडी उत्सवानिमित्त विविध सामाजिक उपक्रम उत्साहात पार पडले.
शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या धावण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकास रोख पारितोषिक व प्रशस्तिपत्रक देण्यात आले. समाज उल्लेखनीय कार्य
करणाऱ्यांचा गौरव करण्यात आला. समाजामध्ये वैद्यकीय, शैक्षणिक व गोरगरिबांना मदत करणाऱ्या समाजसेवकांचा समाजरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते गणेशराव आबनावे, इंडिया कंपनीचे व्यवस्थापक शेखर बारभाई, संजय भोसले, गणेश डोंबे, पल्लवी संतोष वाघ या मान्यवरांना ‘समाजरत्न’ पुरस्काराने सिने अभिनेत्री शीतल ढेकळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मानाची दहीहंडी शिवतेज दहीहंडी मंडळ बारामती यांनी फोडली. एक लाख ११ हजार रुपये रोख पारितोषिक व मानचिन्ह मानसेचे जिल्हा अध्यक्ष (बारामती) पोपट सूर्यवंशी यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच ५५ अनाथ आश्रमातील मुलांना कपडे अन्नधान्य व इतर जीवनावश्यक वस्तू यांचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार संजय जगताप, प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, माजी विश्वस्त संदीप जगताप, जिसा संस्थापक सुरेश उबाळे, सचिन सोनवणे, माजी नगरसेवक सतीश घाडगे, गौतम भालेराव, गणेश कुंभार, श्रेयस जगताप, रणजित काळे, रोहन जगताप, अविनाश बारभाई, सतीश खोमणे, सचिन नरवडे आदी उपस्थित होते. या दहीहंडी सोहळ्याचे नियोजन उमेश जगताप, पुरंदर तालुका अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अमोल कुदळे शाहीर सगनभाऊ दहीहंडी उत्सव मंडळ यांनी केले. सूत्रसंचालन नीलेश जगताप यांनी तर मनसे महिला आघाडीच्या अध्यक्षा आरती नरवडे यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.