जेजुरी, ता. १७ : बेलसर (ता. पुरंदर) येथील प्रगतशील शेतकरी व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले महादेव रंगनाथ गरुड (वय ८३) यांचे निधन झाले.
ते बेलसर विविध कार्यकारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष होते. बेलसर परिसरातील सामाजिक व धार्मिक कार्यात ते सतत सहभागी असायचे. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई नातवंडे, परतुंडे असा मोठा परिवार आहे. गुरोळी शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र गरुड आणि सिरम कंपनीचे सेवानिवृत्त अधिकारी अशोक गरुड हे त्यांचे पुत्र होत. जिजा अॅग्रो-टुरिझमचे प्रोपायटर सूरज गरुड व देवांशू गरुड हे त्यांचे नातू होत.
03307