पुणे

जेजुरीत दीडशे वर्षानंतर जानाईची जत्रा भरणार

CD

जेजुरी, ता. १७ ः जेजुरीत वर्षातून दहा ते बारा यात्रा भरतात. मात्र गावची ग्रामदैवताची जत्राच होत नव्हती. यंदा मात्र ग्रामस्थांनी पुढाकार घेतला असून ग्रामदेवता जानाई देवीची जत्रा दीडशे वर्षानंतर होणार आहे. चैत्र महिन्यातील अष्टमीला दहा एप्रिलला मुख्य जत्रा साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
जेजुरीत बारा यात्रा भरतात. नेहमी भरणाऱ्या यात्रांमुळे ग्रामदैवत जानाई देवीची यात्रा काळाच्या ओघात मागे पडली. आता दीडशे वर्षानंतर
पुन्हा जत्रा भरणार असल्याने जेजुरी व पंचक्रोशीतील नागरिकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जेजुरी गडाच्या पायथ्याशी असणाऱ्या होळकर तलावा काठी ग्रामदैवत जानाई देवीचे मंदिर आहे. लोकवर्गणी, देवसंस्थान व विविध संस्थानच्या वतीने सुमारे चार कोटी रुपये खर्च करून नव्याने मंदिर उभे करण्यात आले आहे. गेल्यावर्षी या मंदिराचे कलशारोहण करण्यात आले.
जानाई देवीचे मूळ स्थान सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवकणे येथील डोंगर खोऱ्यात असून दरवर्षी जेजुरीतून देवीची पालखी सोहळा निवकणे येथे जातो. जेजुरीत असंख्य भाविक तेथे यात्रेसाठी जातात. मात्र ग्रामदेवतेची जत्रा जेजुरीत साजरी होत नसल्याने ही यात्रा साजरी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला.
या जत्रेच्या नियोजनाच्या निमित्ताने जानाई देवी मंदिरात ग्रामस्थांच्या बैठकीचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी जेजुरी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई, जेजुरी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे, ग्रामदैवत जानाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुधीर गोडसे, श्री खंडोबा पालखी सोहळा समिती खांदेकरी मानकरी मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पदाधिकारी राजेंद्र पेशवे, गणेश आगलावे, छबन कुदळे, रोहिदास माळवदकर, संतोष खोमणे, विजय झगडे, कृष्णा कुदळे, पंडित हरपळे, माणिक पवार, रामदास माळवदकर, माऊली खोमणे, सतीश घाडगे, आप्पासाहेब बारभाई आदी उपस्थित होते.
दहा एप्रिल दरम्यान तीन दिवसीय जत्रा उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून या नियोजनासाठी यात्रा समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे सुधीर गोडसे यांनी सांगितले. यात्रा समिती यात्रेचे नियोजन करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ali Jafari Iran strategy: अली जाफरी कोण आहेत? इराणची कडवी झुंज! अमेरिका-इस्रायलसारख्या महाशक्तींचा विजय का अशक्य ठरतोय?

Supreme Court on Menstrual Leave : ...तर महिलांच्या करिअरवर परिणाम; मासिक पाळीच्या रजेबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका

'मला इच्छा आहे परंतु मी प्रेग्नेट नाही' नीना गुप्ता यांचा खुलासा, म्हणाल्या...'गोड बातमी असावी असं वाटतं पण...'

IPL 2026 Marathi News: कदाचित महेंद्रसिंग धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा, तो पिवळ्या जर्सीत पुन्हा दिसणार नाही !

Student Emotional Story : 'आई-वडील या जगात नाहीत..', चिमुरड्याचे 'ते' शब्द ऐकून डोळ्यात येईल पाणी; शिक्षकानं त्याच्यासोबत जे केलं, ते पाहून तुम्हीही कराल सलाम!

SCROLL FOR NEXT