जेजुरी, ता. १ : संविधानातील कलम २१ मधील सन्मानाने जगण्याच्या हक्कानुसार आरोग्य सेवा मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. ती चांगली मिळण्यासाठी आपण सजग असले पाहिजे, असे मत मासूम संस्थेचे संस्थापक विश्वस्त डॉ. रमेश अवस्थी यांनी सांगितले.
जेजुरीत (ता. पुरंदर) महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ व मासूम संस्थेच्या वतीने आरोग्य संवाद हा कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन केले होते. यावेळी तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील आरोग्य सेवांचा मासूमच्या वतीने अभ्यास करण्यात आला. याची मांडणी सोनाली सुतार यांनी केली. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांमध्ये सामान्य नागरिकांना येणाऱ्या अडचणी, त्याचसोबत आरोग्य सुविधांच्या कमतरता अशा विविध प्रश्नांवर सर्वसामान्य महिला व पुरुष तसेच युवकांनी तालुका आरोग्य अधिकारी तसेच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य यांच्यासमोर प्रश्न उपस्थित केले.
परिंचे आरोग्य केंद्र संकेत जाधव, बेलसर आरोग्य केंद्रातील तुषार झुरंगे, अतिश जगताप, मोहन शिंदे, मंगल मोरे, गणेश तांबे इत्यादी नागरिकांनी आरोग्य सेवेमधील कमतरतेसंदर्भातील प्रश्न मांडले.
यावेळी जयश्री नलगे, रवी वाघमारे, शकुंतला भालेराव यांनी आरोग्याच्या प्रश्नांवर मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद सदस्य प्राजक्ता दुर्गाडे, हरिभाऊ लोळे यांनी आलेल्या आरोग्य प्रश्नांवर जिल्हा पातळीवर पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या अंतर्गत काम करणाऱ्या आरोग्य सेविका राणी पांगारे, अनिता नेवसे, आशा कार्यकर्त्या रोहिणी माकर, कीर्ती भोसले, संगीता जाधव, सुनीता तांबे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी विक्रम काळे, जयश्री नलगे, मीना शेंडकर, डॉ.प्राजक्ता दुर्गाडे, हरिभाऊ लोळे, मंगल मगर, मीना शेंडकर, अजय इंगळे, वैशाली कुंभारकर आदी उपस्थित होते.
छाया मल्लाव यांनी सूत्रसंचालन तर कावेरी कुंभारकर यांनी आभार मानले.