जेजुरी, ता. ११ : जेजुरी (ता. पुरंदर) नगरपालिकेच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसह इतर अनेक योजनांना निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. पाणी पुरवठा योजनेच्या कामाचे लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार असल्याचे आमदार विजय शिवतारे यांनी सांगितल्याचे नगराध्यक्ष जयदीप बारभाई यांनी सांगितले.
जेजुरी नगरपालिकेच्या विविध योजनांच्या कामासाठी आमदार शिवतारे यांच्या समवेत सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांची मुंबई
येथे विधान भवन येथे भेट घेतली. जेजुरीच्या विविध योजनांना शासकीय मंजुरीबरोबरच योजनांसाठी निधी उपलब्ध करून मिळण्यासाठी भेट घेऊन मागणी केली. त्यात यात्रा कर, पाणीपुरवठा योजना, स्वच्छता, दलित वस्ती सुधार निधी, शहरांतर्गत रस्ते, विविध सार्वजनिक योजना याबाबत नगराध्यक्ष बारभाई यांनी मांडणी करत निधीची मागणी केली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जेजुरीच्या विकासासाठी लवकरात लवकर निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले, पाणीपुरवठा अधिकारी बिराजदार, माजी नगराध्यक्ष रोहिदास कुंभार, माजी उपनगराध्यक्ष रमेश बायास, माजी नगरसेवक सत्यवान उबाळे, सुशील राऊत, नगरसेवक योगेश जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, जेजुरी नगरपालिकेच्या विविध योजनांविषयी विजय शिवतारे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.