पुणे

तक्रारवाडीतील टोलमाफीसाठी स्थानिक आक्रमक

CD

जेजुरी, ता. २० : पुणे- पंढरपूर महामार्गावरील तक्रारवाडी फाटा बेलसर (ता. पुरंदर) येथील टोल नाक्यावर दोन दिवसांत टोलवसुली सुरू होत आहे. मात्र, स्थानिक भूमिपुत्रांना टोलमधून पूर्णतः सूट न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने टोलवसुलीचा ठेका एका कंपनीला दिला आहे. मात्र, स्थानिक शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता ही वसुली सुरू होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. सासवड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण असून बाजारपेठ, रुग्णालये आणि शासकीय कामांसाठी पूर्व पुरंदरमधील नागरिकांना याच मार्गावरून जावे लागते. महामार्ग विस्तारीकरणासाठी स्थानिकांनी जमिनी दिल्या असल्याने त्यांना टोलमाफी मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे संदीप जगताप, राष्ट्रवादीचे रमेश लेंडे, मनसेचे उमेश जगताप, गणेश कुंभार, यशवंत दोडके, शिवराज झगडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी टोल व्यवस्थापकांना निवेदन दिले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, आमदार विजय शिवतारे आणि माजी आमदार संजय जगताप यांनी यात लक्ष घालून न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली. दरम्यान, आमदार विजय शिवतारे यांनी आंदोलकांशी संवाद साधून, खेड-शिवापूरच्या धर्तीवर स्थानिकांना टोलमाफी मिळवून देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे आश्वासन दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Water Supply : पुण्यात एक दिवसाआड पाणी? आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष; वेळापत्रक तयार करण्याचे आदेश

Nagpur News : पोलिस कर्मचाऱ्याने स्नेहाची मृत्यूपूर्वीची चिठ्ठी रेकॉर्डवर घेतलीच नाही; चौकशीत झाले उघड

Shivrajyabhishek Din : स्वराज्याची राजधानी तेजोमय! शिवभक्तांचा मार्ग झाला प्रकाशमय

Sakal Vidya Education Expo 2026 : एकाच छताखाली करिअरच्या दिशा; गायिका बेला शेंडे यांच्या हस्ते आज प्रदर्शनाचे उद्‌घाटन

Mohol News : विवाहितेचा मृत्यू डॉक्टरच्या हायगयीने झाल्याचा नातेवाईकांचा आरोप; नातेवाईकांनी डॉक्टरवर कारवाईसाठी मृतदेह आणला पोलीस ठाण्यात

SCROLL FOR NEXT