पुणे

मावडी(क.प)च्या सरपंच चाचर यांना ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्कार

CD

जेजुरी, ता. ६ : पंचायतराज विकास मंच व अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या वतीने दिला जाणारा ‘ग्रामरत्न सरपंच’ पुरस्कार मावडी कडेपठारच्या सरपंच सोनाली बप्पा चाचर यांना प्रदान करण्यात आला. पाचगणी (जि. सातारा) येथे झालेल्या सोहळ्यात महाराष्ट्रातील ५० निवडक सरपंचांमध्ये त्यांची निवड करण्यात आली.

सातारा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजा शिंदे, डॉ. रामजी अडकेकर, अमेय जोशी यांच्या हस्ते आणि पंचायत राज विकास मंचाचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार देण्यात आला. चाचर यांनी गावात सुसज्ज ग्रामपंचायत इमारत, रस्ते, अंगणवाडी, सार्वजनिक पिठाची गिरणी, फिल्टर पाणी आणि वृक्षारोपण यांसारखी विकासकामे राबविल्याबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
या वेळी चाचर म्हणाल्या की, गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. उपसरपंच विनायक पांडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच ही विकासकामे पूर्ण होऊ शकली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VIDEO : चहुबाजूने आगीने वेढल, ग्रिलला लटकला.. पण अचानक खाली कोसळला… थरकाप उडवणारे दृश्य कॅमेऱ्यात कैद

Pharmacy Recruitment : देशभरातील औषधनिर्मात्यांसाठी नवे भरती‑पदोन्नती नियम लागू; पीसीआयची राजपत्रात अधिसूचना

Mumbai-Goa Highway: भरधाव वेगातील थारचं नियंत्रण सुटलं अन्..., दोन जणांचा जागीच मृत्यू; घटनेत कारचा चक्काचूर

Monsoon Alert: पुण्यात अखेर मॉन्सूनची दमदार एन्ट्री; कोकण-मध्य महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट, विदर्भात उष्णतेचा ऑरेंज इशारा कायम

'बिग बॉस मराठी' फेम अनुश्री मानेने दिली गुड न्यूज; खरेदी केलं स्वतःचं घर, गृहप्रवेशाचे फोटो शेअर करत म्हणते- आज...

SCROLL FOR NEXT