पुणे

रशियन मारीअन्नाकडून गणेशमूर्तीचे धडे

CD

जेजुरी, ता. १२ : मुळच्या रशियन असलेल्या आणि भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेल्या मारीअन्ना विवेक आबनावे यांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश दिला आहे. गेल्या ३२ वर्षांहून अधिक काळ जेजुरीत वास्तव्यास असलेल्या मारीअन्ना आपल्या शेतातील शुद्ध मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारतात. याबरोबरच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे महत्त्व पटवून देत आहेत.
जेजुरी येथील जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना मारीअन्ना यांनी शेतमातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. कोणत्याही रासायनिक अथवा कृत्रिम मिश्रणाचा वापर न करता अवघ्या दोन तासांत मातीला मंगलमूर्तीचे रूप देत त्यांनी विद्यार्थ्यांना मूर्तिकलेचे धडे दिले. गणेशोत्सव साजरा करताना निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक असल्याचा संदेशही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कोमल चौगुले उपस्थित होत्या.
मारीअन्ना गेल्या सुमारे ३२ वर्षांपासून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करतात. गणेशमूर्तीची स्थापना, धार्मिक व आध्यात्मिक परंपरेनुसार पूजा-अर्चा तसेच गणेश अथर्वशीर्ष पठणात त्यांचे संपूर्ण कुटुंब सहभागी होते. त्यांचे पती डॉ. विवेक आबनावे हे सेवानिवृत्त शासकीय आरोग्य अधिकारी आहेत. मुले निर्मल, अनुराग आणि युगंधरा हेही आईच्या पर्यावरणपूरक उपक्रमातून प्रेरणा घेत स्वतः गणेशमूर्ती साकारतात.
सेंट पीटर्सबर्ग येथील शिरो युनिव्हर्सिटीमधून कला शाखेची पदवी घेतलेल्या मारीअन्ना या कुशल चित्रकार आहेत. त्यांनी भगवान श्रीगणेशाची अनेक चित्रे साकारली असून, त्यातील काही चित्रे विविध देशांमध्येही पोहोचली आहेत. ‘‘भारत ही देवभूमी असून येथील मातीला विशेष दैवी महत्त्व आहे. जगभर पुजल्या जाणाऱ्या भगवान श्रीगणेशाचा उत्सव भारतात पूर्णपणे प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हायला हवा,’ असे मारीअन्ना यांनी सांगितले.
दरवर्षी गणेशोत्सवातील भक्तिमय क्षण इंटरनेटच्या माध्यमातून त्या रशियातील आई-वडिलांसह कुटुंबीयांपर्यंत पोहोचवतात. हिंदी, मराठी, इंग्रजी आणि रशियन या चार भाषांचे ज्ञान असलेल्या मारीअन्ना यांना गणेश अथर्वशीर्षाबरोबरच खंडोबा स्तोत्रही कंठस्थ आहे.
मायदेशापासून हजारो किलोमीटर दूर येऊन भारतीय संस्कृतीशी एकरूप झालेल्या मारीअन्ना यांनी गणेशभक्तीसोबत पर्यावरण संवर्धनाची ज्योतही तेवत ठेवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

बापरे! अमीषा पटेलच्या आईच्या घरातून डायमंड डायमंडचे दागिने चोरीला; घरातील हाऊस हेल्पला अटक

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Kolhapur Farmer Loan Waiver Second List : शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर! जिल्ह्यातील 3,833 शेतकऱ्यांना दिलासा; तुमचे नाव आहे का?

SCROLL FOR NEXT