पुणे

जुन्नर येथे नागरी वस्तीत पाचवा बिबट्या जेरबंद

CD

जुन्नर, ता. ९ : जुन्नर शहर परिसरात नागरी वस्तीत संचार करणारा पाचवा बिबट्या आज (ता.९) पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले, अशी माहिती वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांनी दिली.
शहरातील लोकवस्तीच्या भागात भर दिवसादेखील वारंवार बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जुन्नर शहरातील आगरपेठ येथे नोहेंबर व डिसेंबर महिन्यात एकाच ठिकाणी तीन बिबटे पकडले होते. त्यानंतर कल्याण पेठेतील नागरी वस्तीतील चौथा बिबट्या जेरबंद झाला. गेल्या काही दिवसांपासून आगरपेठ येथे पुन्हा बिबट्याचा वावर वाढला होता. त्यास पकडण्यासाठी पिंजरा लावण्यात आला होता.
ऊस तोड झाल्यानंतर लपण न राहिल्याने बिबट्यांनी जुन्नर शहरा लगत असलेल्या शेती व नदी-नाल्याच्या झुडपात मुक्काम ठोकला असल्याचे दिसून येत आहे. या भागात बिबट्याचा वावर असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. बिबट्या दिवसा शेतात फिरत असताना दिसतो तर रात्रीच्या वेळी त्याच्या डरकाळ्या कानी पडतात. आगर पेठ येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पूर्ण वाढ झालेला नर बिबट असून त्यास माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आल्याचे जुन्नरचे वनपरिमंडळ अधिकारी नितीन विधाटे यांनी सांगितले.

04908

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : विदर्भात उष्णतेची लाट तर या भागांत अवकाळी पाऊस लावणार हजेरी, आज तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान ? जाणून घ्या

Pune Accident: नवले पूलनंतर पुन्हा भीषण अपघात! जांभूळवाडीत ट्रक धडकून चालकाचा मृत्यू

Iran US Israel War : ‘होर्मुज’ला उत्तर ‘खार्ग’ने? बेट छोटं पण इराणच्या तेलसाम्राज्याचं हृदय... आता जगाला फटका बसणार?

PMPML Bus: ‘पीएमपी’त महिला असुरक्षित; ‘परिसर’चा अहवाल; ५७ टक्के प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण

मीन राशी साप्ताहिक राशिभविष्य (१५ ते २१ मार्च): शुक्राचा अनुकूल प्रभाव, गुढीपाडव्यापासून व्यवसायात प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT