पुणे

तळेरानला रंगला कुस्त्यांचा आखाडा

CD

जुन्नर, ता. १० : तळेरान (ता. जुन्नर) येथील श्री काळुबाई व हनुमान जन्मोत्सव यात्रोत्सवात परंपरेप्रमाणे कुस्त्यांच्या जंगी आखाड्याचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केले होते. यासाठी तालुक्यातून तसेच संगमनेर, साकूर मांडवे, आंबेगाव, अकोले, शिरूर, माळेगाव, मुरबाड अशा विविध ठिकाणाहून मोठ्या संख्येने पैलवान दाखल झाले होते. अनेक पैलवानांनी आपले कौशल्य दाखवत कुस्ती शौकिनांची मने जिंकताना भरघोस बक्षीसे मिळविली. ढालीवरच्या कुस्त्यांनी आखाड्यात रंगत आली. रेवड्यांवरच्या कुस्त्यांनी सुरवात होऊन आखाड्याचे बक्षीस बारा हजारापर्यंत वाढत गेले. शेवटच्या कुस्तीसाठी हनुमान दूध उत्पादक सहकारी संस्था तळेरान यांच्यावतीने चांदीची फिरती गदा तसेच मान्यवर ग्रामस्थ, ग्रामविकास प्रतिष्ठान व गावच्या वतीने रोख बारा हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले होते. गेल्या वर्षी शेवटची कुस्ती निर्णायक न झाल्याने यावर्षी पुन्हा एकदा शेवटची कुस्ती खिरेश्वर येथील दीपक मेमाणे व साकूर मांडवे येथील मंगेश नामदेव गायकवाड या दोघांत लढत होती. दोन्ही पहिलवान तुल्यबळ असल्याने पंधरा मिनीट कुस्ती चालून देखील कुस्तीचा निर्णय न लागल्याने शेवटी कुस्ती सोडविण्यात आली. दोन्ही पैलवानांना मानाचा फेटा बांधून ढाल व रोख स्वरूपात रक्कम देऊन गौरव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''शेण कुणी खाल्लं हे संजय राऊतांना विचारा'', सुषमा अंधारेंच्या 'त्या' टीकेला काँग्रेसचं उत्तर...

Alephata News : शेतकरी पुत्राची कृषी अधिकारीपदी झेप; आळे येथील आदित्य तितरचे यश

Bhor Crime : भोरमध्ये दरमहा चार तरुणींचे पलायन; पोलिसांसमोर आव्हान, पाच वर्षांत आठ महिला बेपत्ता

IPL 2026 तोंडावर असताना जसप्रीत बुमराह बंगळुरूतील CoE मध्ये दाखल ! मुंबई इंडियन्सला धक्का बसणार?

माहेरी गेलेल्या पत्नीला एकटं गाठून पतीने केला जीवघेणा हल्ला, घरात रक्ताचा सडा; फरार पतीचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT