पुणे

हातविज येथील कांचन धबधबा प्रवाहित

CD

जुन्नर, ता.६ : दुर्गम आदिवासी भागातील हातविज (ता.जुन्नर) येथील कांचन धबधबा सततच्या पावसामुळे प्रवाहित झाला आहे. यामुळे येथे वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांची गर्दी वाढत आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या अडचणी तसेच कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी बुधवारी (ता.५) धबधबा व परिसराची पाहणी सरपंच महादू निर्मळ यांनी केली.
जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागाला निसर्गाचे वरदान लाभलेले आहे. येथील कांचन धबधबा दोन तीन वर्षांपासून पर्यटकांना भुरळ घालत आहे. उंच डोंगरावरून फेसाळत वाहत येणाऱ्या पाण्याचा प्रवाह सुमारे २५० ते ३०० फूट उंचीवरून खाली कोसळत असल्याने हा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.
या परिसरात दुर्गादेवी मंदिर, दुर्गाबाई बान, कोकण कडा, रिव्हर्स फॉल तसेच खळखळणारे ओढे-नाले, फेसाळत वाहणारे धबधबे, हिरवागार निसर्ग पाहण्यास मिळतो. पर्यटकांनी वर्षाविहाराचा आनंद लुटावा. मात्र या परिसरात येताना आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. मद्यपान करू नये. पर्यटनस्थळाचा आनंद लुटताना पर्यावरणाला हानी पोहचणार नाही याची दक्षता घ्यावी. नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन पर्यटक मार्गदर्शक किरण म्हसकर यांनी केले आहे.
यावेळी त्यांच्या सोबत ग्रामसेवक वीरेंद्र गवारी, वनरक्षक मंगल जाधव, सदस्य उषा पारधी,ग्रामस्थ भीमा पारधी व पर्यटक मार्गदर्शक किरण म्हसकर उपस्थित होते.

05472

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT