पुणे

प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांसाठी येत्या सोमवारी ''झेडपी''वर आंदोलन

CD

जुन्नर,ता.११ : प्राथमिक शिक्षकांच्या मागण्यांबाबत सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. यामुळे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने येत्या सोमवारी (ता.१७ ) पुणे जिल्हा परिषदे समोर धरणे आंदोलन केले जाणार आहे, असे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब लांघी यांनी सांगितले. तसेच पहिल्या टप्प्यात प्रत्येक जिल्ह्यात सत्याग्रह, धरणे, निदर्शने, केली जाणार आहेत.
राज्य सरकार जिल्हा परिषद, नगर पालिका व महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षकांच्या न्याय मागण्यांबाबत संवेदनशील नाही, अशी टीका शिक्षक समितीचे राज्य अध्यक्ष विजय कोंबे, कोषाध्यक्ष नंदकुमार होळकर, जिल्हाध्यक्ष सुनील वाघ, सरचिटणीस संदीप जगताप यांनी केली आहे.

राज्य सरकारने प्राथमिक शिक्षकांसाठी मुख्यालयी राहण्यासाठी कोणतीही व्यवस्था केलेली नसताना मुख्यालयी राहत नसल्याचे कारणावरून घरभाडे भत्ता कपात केला जात आहे. अन्य कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीचे चार हप्ते मिळाले. मात्र जिल्हापरिषद प्राथमिक शिक्षकांना अद्याप दुसराही हप्ता मिळाला नाही. तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या वेतनास मागील वर्षापासून सातत्याने विलंब होत आहे. वेतनासाठी पुरेसे अनुदान दिले जात नाही, वैद्यकीय प्रतिपूर्ती आणि प्रवास भत्यासाठी अनुदान दिले जात नाही.सेवानिवृत्त शिक्षकांना उपदान,अंशराशीकरण, गटविमा वषार्नुवर्षे विलंबाने दिला जात आहे.
अशैक्षणिक कामातून शिक्षकांची सुटका करावी. कमी पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करू नये. आंतरजिल्हा बदली धोरणात अन्यायकारक बदल केले जात आहेत. दरम्यान, पदवीधर विषय शिक्षक म्हणून कार्यरत प्राथमिक शिक्षकांतून औदासीन्याची आहे. पदोन्नती देणे आवश्यक असताना सरळसेवेने भरतीचा घाट घालून, पात्र शिक्षकांना वंचित ठेवले आहे आदी कारणामुळे आंदोलन करण्याचा निर्णय झाला आहे, असे लांघी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

Nagpur Crime : दारुड्या प्रवाशाचा हायव्होल्टेज ड्रामा! दारूच्या नशेत पकडली ठाण्यात पोलिसाची कॉलर

Gujarat UCC: गुजरातमध्ये समान नागरी कायदा लागू करण्यास राष्ट्रपतींची मंजुरी; काय असेल नियमावली?

SCROLL FOR NEXT