पुणे

मुलीच्या मृत्यूची चौकशी करून कारवाई करा

CD

जुन्नर, ता. १० : आदिवासी भागातील शिवली (ता. जुन्नर) येथील मगन कोथेरे यांनी आपल्या मुलीचा मृत्यू डॉक्टर, आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर यांच्या हलगर्जीपणाने तसेच बेजबाबदार वागणुकीमुळे झाला असल्याने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी आणि तहसीलदार विकास सबनीस यांच्याकडे केली.
याबाबत माहिती अशी की, कोथेरे यांच्या जया व विजया या दोन मुली घरी असताना जया हिला सर्पदंश झाला असल्याचे विजया हिने शेतात काम करत असलेल्या वडिलांना सांगितले. कोथेरे शेतातून पळत घरी आले. यावेळी मुलगी जया आशा वर्कर देवकाबाई कोकणे यांच्या दारात रडत असल्याचे निदर्शनास आले. तिला मेघनाथ बोऱ्हाडे यांच्या मोटारसायकलवरून प्राथमिक आरोग्य केंद्र इंगळूण येथे उपचारासाठी दाखल केले. याठिकाणी डॉक्टर गैरहजर आढळून आले. आरोग्य कर्मचारी महिलेने मुलीस इंजेक्शन देण्यासाठी चालवत नेले. नंतर रक्तदाब तपासून येथे उपचार होणार नाहीत. तुम्ही पुढील उपचारासाठी जुन्नरला जा, असे सांगितले. यावेळी त्यांच्याकडे रुग्णवाहिकेची मागणी केली असता, रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे सांगून तुम्ही तुमच्या पद्धतीने रुग्णाला नेण्याची सोय करा, असे सांगितले असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
माझ्या मुलीला पुढील उपचारासाठी मोटारसायकलवरून जुन्नरला ग्रामीण रुग्णालयात नेले असता, उपचारादरम्यान मृत्यू झाला. याला जबाबदार असणाऱ्या सर्वांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी कोथेरे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde Jayant Patil : जयंत पाटील आणि शशिकांत शिंदेंमध्ये दुरावा?, शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं; कोल्हापुरातून पक्षाची बांधणी करणार

"पॉकेटमनीसाठी बाप पाहिजे आदर करण्यासाठी नको" सावत्र भावाचे प्रतीक बब्बरवर आरोप; "आता त्यांना बाबा म्हणत नाही"

IPL 2026: पंजाब किंग्सच्या मार्गातील मोठी 'अडचण' दूर! LSG साठी पाचशेहून अधिक धावा करणारा फलंदाज संघाबाहेर

Crime: अल्पवयीन भाचीची छेड काढली, नंतर पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मामाला एकट्यात गाठलं अन्... ठाण्यात रक्तरंजित थरार

Marathi Live News update: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली

SCROLL FOR NEXT